खुनाच्या आरोपातील असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य वामन साठे यांना सशर्त अटकपुर्वक जामिन मंजुर
सत्तेची मस्ती व राजकीय द्वेशातुन खुनाच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न..
पैठण/प्रतिनिधी/ पैठण तालुक्यातील बिडकीन येथे काही महीन्यापुर्वी म्हणजे दि.२३/१०/२०२५ रोजी मौजे बिडकीन ता पैठण जि.छत्रपती संभाजीनगर येथे वाढदिवसाचे बॅनर लावण्यावरुन झालेला वाद व वादाचे रुपांतर मारहाण,आणि त्यामध्ये झालेला खुन यावरुन बिडकीन पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा नोंद झाला होता.त्या गुन्ह्यामध्ये बिडकीन येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य वामन रामराव साठे यांना बिडकीन येथील राजकीय द्वेशातुन,आणि सत्तेची मस्ती व त्या मस्तीचा गैरवापर करुण राजकीय दबाव टाकत बिडकीन पोलीस ठाणे येथे सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत वामन साठे यांना झालेल्या खुन प्रकरणात आरोपी करण्यात आले होते.साठे यांनी मा.जिल्हा व सत्र न्यायालय पैठण येथे जामिन अर्ज दाखल केला होता.परंतु मा.न्यायलयाने सदर जामिन अर्ज फेटळल्यानंतर वामन साठे यांनी मा.उच्च न्यायालय,खंडपीठ.छत्रपती संभाजीनगर येथे अटकपुर्व जामिन मिळवण्यासाठी धाव घेतली होती.त्यानंतर प्रकरण दाखल झाल्यानंतर मा.उच्च न्यायालय,खंडपीठ.औरंगाबाद येथे सरकार तर्फे सरकारी अभियोक्ता व तक्रारदार यांचे विधीज्ञ व वामन साठे यांच्या वतीने ॲड.सतेज जाधव व ॲड.अविनाश एस.बांगर यांनी आरोपीची बाजु मांडून सदरील घटनेशी वामन साठे यांचा काहीही संबंध नाही,आरोपी वामन साठे यासं प्रस्तुत प्रकरणात आरोपी म्हणुन आणि सत्तेची मस्ती असलेल्या राजकीय द्वेशातीन व पोलीस यंत्रेनेवर दबाव टाकुन जानिवपुर्वक वामन साठे यांच्यावर आरोप करण्यात गोवण्यात आले.तसेच आरोपी साठे हे घटनेच्यावेळी घटनास्थळीच हजर नव्हते,असे मा.उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर मा.न्यायालयाने बिडकीन येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य वामन साठे यांना सशर्त अटकपुर्वक जामिन मंजुर केला आहे.