शेतकऱ्यांची तीक्ष्ण हत्याराने वार करून खून सिरसगाव येथील घटना अज्ञात आरोपी फरार
कन्नड /प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील सिरसगाव येथे शेतात बसलेल्या शेतकऱ्यांची अज्ञात कारणासाठी तीन जणांनी तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार करून खून केल्याची घटना तालुक्यातील सिरसगाव शिवारात घडल्याने खळबळ उडाली आहे. कन्नड ग्रामीण पोलीसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक १२ जुलै २०२५ रोजी सिरसगाव ते जैतापुर रोडवरील गट क्रमांक २८ मधील शेतावर मजुरांमार्फत मका पिकाला खत टाकण्याचे काम करणे असल्याने राजाराम उर्फ राजू भावसिंगचुंगडे वय ४७ सकाळी ९:३० वाजता कन्नड येथून घरातून निघाले होते. त्यांनी नवनाथ जयसिंग पवार रा. सिरजापुर तांडा ता. कन्नड जि. छञपती संभाजीनगर यांना सोबत घेवून अंदाजे ११:०० वाजेच्या सुमारास शेतात गेले होते. शेतातील मका पिकाला खत टाकण्याचे कामगाराला काम सांगुण अंदाजे ११:३० ते १२:०० वाजेच्या दरम्यान राजाराम उर्फ राजू चुंगडे शेतातील घराजवळ बसलेले असतांना तेथे दोन अनोळखी पुरुष व एक अनोळखी महिला हे मोटार सायकलने
आले व त्यांनी राजाराम उर्फ राजू चुंगडे यांना अज्ञात कारणासाठी कोणत्यातरी धारदार शस्त्राने त्यांचे डोक्यावर (डाव्या कानाच्या पाठीम ागे), उजव्या व डाव्या हातावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. शेतात काम करणारे नवनाथ जयसिंग पवार रा. सिरजापुर तांडा ता. कन्नड यांना राजाराम उर्फ राजू चुंगडे यांचा ओरडण्याचा आवाज आल्याने ते नवनाथ पवार हा राजाराम उर्फ राजू चंगडे यांच्याकडे धावत आले असता त्यातील एका अनोळखी पुरुषाने त्यांना हाताने थांबण्याचा इशारा दिल्याने ते घाबरले असल्याने ते तेथेच थांबले त्यानंतर राजाराम उर्फ राजू चुंगडे यांच्यावर वार करणारे दोन
अनोळखी पुरुष व एक अनोळखी म हिला हे तेथुन पळुन गेले. त्यानंतर तेथील परिसरातील शेतात काम करणारे शेतकरी घटनास्थळी जमा झाले. आणी सोनु कैलास चंदवडे यांच्या चारचाकी वाहनाने राजाराम उर्फ राजू चुंगडे यांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात आणुन दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी राजाराम उर्फ राजू चुंगडे यांना तपासुन मृत घोषीत केले. घटनेची माहिती मिळताच अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, कन्नड ग्रामीणचे साहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. या खून प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरज राजाराम चुंगडे रा. सिरसगाव ह.मु. निसर्ग सिटी हिवरखेडा रोड कन्नड यांच्या फिर्यादीवरून दोन अनोळखी पुरुष व एक अनोळखी महिला यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार हे करीत आहेत.