खुलताबादच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, ट्रामा केअर सेंटर कामाची लवकरच होणार सुरुवात – आमदार सतीश चव्हाण यांची ग्वाही
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी शनिवारी (ता. ६) खुलताबादला भेट देऊन येथील दर्गा हजरत सय्यद जैनोद्दीन मौलाना दाऊद हुसैन शिराजी उर्फ बावीस ख्वाजा रह. तसेच दर्गा हजरत बाबा बुरहानोद्दीन गरीब रह. येथे हजेरी लावून मनोभावे दर्शन घेत मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान आमदार चव्हाण यांचा खुलताबादच्या सर्वांगीण विकासातील योगदाना बद्दल दर्गा कमिटीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. उरूसच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करून दिल्याबद्दल तसेच खुलताबाद ग्रामीण रुग्णालय येथे ट्रामा केअर सेंटरसाठी महत्त्वपूर्ण निधी मंजूर करून आणल्याबद्दल त्यांना विशेष सन्मान देण्यात आला.मुख्य रस्त्याचे काम उरूसापूर्वी पूर्ण झाल्याने भाविकांची मोठी गैरसोय टळली.
सत्कार सोहळ्यावेळी दर्गा कमिटीचे सर्व पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते.यावेळी आमदार चव्हाण म्हणाले की, खुलताबाद ट्रामा केअर सेंटरचे काम लवकरच प्रत्यक्षात सुरू होणार आहे.तसेच या प्रकल्पासाठी किंवा शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजीत दादा पवार यांच्याकडून उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी दर्गा कमिटी हद्दे खुर्दचे अध्यक्ष शरफोद्दीन रमजानी,दर्गा कमिटी हद्दे कलांचे अध्यक्ष एजाज अहेमद, उपाध्यक्ष इमरान जहांगीरदार,सचिव मोहम्मद मतीन,माजी नगराध्यक्ष तथा दर्गा कमिटीचे सदस्य अँड.कैसरोद्दीन, मुनीबोद्दीन,माजी नगराध्यक्ष हाजी अकबर बेग,राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष गजानन फुलारे,कार्याध्यक्ष शेख तौसीफ़ अहेमद,माजी नगरसेवक अनीस जागीरदार मिर्झा अयाज बेग,रईस मुजावर,शेख शाज़ेब,मोहम्मद अबरार,शेख वाजिद,अँड. शेख अनिस, अँड. शब्बीर अहमद,हुस्नोद्दीन टेलर,
शेख नजीम, युवा नेता मुजाहिद कुरेशी शेख आदीब, अब्दुल अजीज.यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
