धार्मिक असो कि सामाजिक खुशखबर असो की दु:खद बातमी णमोकार एसएमएस सेवेतून देतात माहिती
कल्पना अशी सुचली
समाजातील एका व्यतीचे निधन झाल्यानंतर एकदा त्यांनी संबंधित कुंटूबीयांच्या बाहेरगावी असणार्या अनेक नातेवाईकांना व परिचितांना हि घटना कळवण्याचे काम केले. यावेळी अशी एखादी सेवा असावी हे त्यांच्या लक्षात आले. त्यातूनच हि कल्पना सूचली आणि त्यांनी समाजाप्रती का होईना हि णमोकार एस.एम.एस सेवा सुरू केली. सुरूवातीला मनोज छाबडा यांनी मोबाईलवरून एस.एम.एस सेवा करून हि सेवा पुरवली. पहिल्याच वेळेस त्यांना तीनशे पेक्षा जास्त समाज बांधवांनी संपर्क साधून आपला नंबर कळवला. त्यानंतर जास्तीत जास्त लोक जोडले गेल्याने मोबाईलवर सेवा देणे अशय ठरले. त्यामुळे ते आता इंटरनेटचा वापर करण्यात आल. आता व्हाट्सअॅप सोशल मिडियाच्या माध्यमातून हि सेवा सुरू आहे.
३०० लोकांपासून पंधरा वर्षापूर्वी णमोकार एस.एम.एस ची सेवा चालू झाली. आज ती २० हजार ते ३० हजार लोकांपर्यंत व्हॉट्सग्रुपच्या माध्यमातून सकल दिगंबर जैन समाजात घरोघरी, गाव, तालुका, नगर, महानगर, शहरापर्यंत याचा व्याप वाढला आहे. हि सेवा २४ तास चालू असते. तसेच णमोकार एसएमएसच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीतून रतदान शिबिर, अन्नदान वाटप विविध सामाजिक कार्यक्रम करण्यात येते.
मनोज छाबडा व प्रिया छाबडा या दांपत्याने पंधरा वर्षांपासून णमोकार व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून लोकांना जोडण्याचे कार्य केले. जैन समाजातील धार्मिक कार्यक्रम असो की सामाजिक, चांगली घटना असो की दुःखद, त्याची माहिती संबंधितांच्या नातेवाइकांना आणि परिचितांना कळवण्याचे काम आता णमोकार ग्रुपच्या माध्यमातून होत आहे. शहरात जैन समाज मर्यादित असला तरी त्यांचे काम मोठे आहे. प्रिया छाबडा यांच्या माध्यमातून महिलांसाठी गृहउद्योग व रोजगार मिळावा या हेतूने णमोकार वुमन ग्रुपच्या माध्यमातून दोन हजार महिला जोडल्या गेल्या आहेत. यात कुणी ब्यूटी पार्लर, कुरडया, पापड करणारे, कपड्यांचा व्यवसाय असे छोटे मोठे व्यवसाय करणार्या महिला आहेत. अशा महिलांमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होत आहे. जैन समाजात अनेक जण व्यवसायात गुंतलेले आहेत. त्यामुळे एकमेकांच्या घरी जाणे यातूनही वेळ काढावा लागतो. एखादी दुःखद घटना घडल्यास त्याची माहिती नातेवाइकांसह समाजात पोहोचावी यासाठी णमोकार ग्रुप मोफत सेवा देत आहे.
