सावळदबारा परिसरात खरीप पेरणी सुरु
सावळदबारा/प्रतिनिधी/ सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरात दि.14. जून रात्री जोरदार पाऊस झाल्याने रविवार रोजी शेतशिवारात कपाशी,मका, सोयाबीन, तुर या पिकाची पेरणी सुरु आहेत सावळदबारा सह परिसरात दोन दिवसापासून जोरदार पाऊस झाल्याने शेतात मध्ये पाणीच पाणी साचलेले होते रविवार रोजी
सावळदबारा येथील शेतकरी तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते यांनी आपल्या शेतात खरीप पेरणीसाठी शेतीची पूजा करून पेरणीला सुरुवात करण्यात आली कपाशी पिकाचे लागवड करण्यात आली आहेत