” खरी कमाई ”
बाल आनंद नगरी उपक्रमात उसळली उत्साहाची लाट; जिल्हा परिषद शाळेत भरला ज्ञान–अनुभवाची जत्रा.
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे व केंद्रप्रमुख फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दशसूत्री व आनंददायी शिक्षण उपक्रमाअंतर्गत, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किरणकुमार पाटील यांच्या संकल्पनेतून “खरी कमाई – बाल आनंद नगरी” हा उपक्रम भव्यदिव्य उत्साहात पुर्ण शनिवारी (दि. ६)संपन्न झाला.
शाळेच्या प्रांगणात हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला पालक, गावकरी, माजी विद्यार्थी आणि मान्यवरांचा एवढा मोठा सहभाग होता की जणू काही गावात एखादा मोठी जत्रा किंवा बाजार भरल्याचा भास होत होता. प्रचंड उत्साह, कौतुकाची दाद आणि विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे शाळा परिसर आनंदनगरीत परिवर्तित झाल्याचे पहावयास मिळले.
विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने तयार केलेली विक्री-केंद्रे, कला-प्रदर्शने, खेळ स्टॉल, खाद्यपदार्थ, हातगुंतीच्या वस्तू, छोटेखानी व्यवसाय, सेवा-केंद्रे, तिकीट पद्धतीचे व्यवहार अशा विविध उपक्रमांनी पालकांची मने जिंकली. मुलांच्या चलाख गणिती व्यवहार कुशलता, पैशाचे व्यवस्थापन, संवाद कौशल्य, सृजनशीलता आणि आत्मविश्वास पाहून सर्व उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
नाविन्यपूर्ण उपक्रमाला बँक ऑफ महाराष्ट्र सोयगाव शाखा व्यवस्थापक धीरज भुरे, सोयगाव केंद्राचे केंद्रप्रमुख फिरोज तडवी, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा राधाबाई सोनवणे,सदस्य अण्णा वाघ, शालेय समिती सदस्य रंगनाथ लोखंडे, समाजसेवक कृष्णा पाटील,माजी विद्यार्थी संघ सदस्य राजू कुडके, समाजसेवक दत्तुभाउ रोकडे, नगरसेवक हर्षल काळे, समाजसेवक राजेंद्र दुतोडे, मुख्याध्यापक किरणकुमार पाटील.विशष उपस्थिती लाभली.उपक्रमामधून विद्यार्थ्यांनी व्यवहारातील गणित, सहकार्य, जबाबदारी आणि उद्यमशीलतेचा उत्कृष्ट अनुभव घेतला. पालकांनीही आपल्या मुलांच्या कल्पकतेचे आणि परिश्रमाचे मनापासून कौतुक केले.
मुख्याध्यापक किरणकुमार पाटील यांनी सर्व मान्यवरांचे, पालकांचे, शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक आभार मानत उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. “शिक्षण हे केवळ पाठांतर नव्हे, तर जीवन जगण्याची कला शिकवणे हेच आमचे ध्येय आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
उपक्रमातून एकूण ३५,८७५ रुपये इतकी खरेदी–विक्रीचा व्यवहार झाला.
बाल आनंद मेळाव्यास पालकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून त्यातही महीला पालकाचा सहभाग वाखाणण्या जोगा होता.कार्यक्रम यशस्वीते साठी शाळेचे मुख्याध्यापक किरणकुमार पाटील,पदवीधर शिक्षक सुरेखा चौधरी,पंकज रगडे,रामचंद्र महाकाळ,सहशिक्षक मंगला बोरसे,सविता पाटील,प्रतिभा कोळी,शेख विखार,बिलाल बागवान,अनिल देसाई,तानाजी चव्हाण,शुभम देसले,पुनम लाड यानी अथक परिश्रम घेतले.