खिर्डी ग्रामपंचायत समोर ध्वजारोहण शेख चांद यांचे हस्ते संपन्न
खिर्डी गावात ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याला उत्साहात सुरुवात.
खुलताबाद/प्रतिनिधी/ भारतात देशभक्तीची भावना दृढ करण्यासाठी केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा तिसरा आणि अंतिम टप्पा १३ ऑगस्ट पासून सुरू झाला आहे.हा टप्पा १५ ऑगस्ट पर्यंत चालणार असून, देशभरात मोठ्या प्रमाणावर ध्वजारोहण सोहळे,देशभक्तीपर कार्यक्रम आणि जनसहभागी उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत.या निमित्ताने खुलताबाद तालुक्यातील खिर्डी येथे अल्पसंख्यक युवक शेख चांद यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालया समोर ध्वजरोहण करण्यात आले व खिर्डी. गावाने ‘सर्व धर्म समभाव’चे उदाहरण घालून दिले.यावेळी सरपंच कृष्णा दवंडे, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य कृष्णा चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य आकाश हिवरडे,संदीप औटे,ग्रामसेवक बैनवाड,शालेय समितीचे अध्यक्ष बाळू गायके,संतोष जेठे, शंकर हिवरडे,माजी शिक्षक शिवाजी धोत्रे, तसेच आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षकवर्ग, ग्रामपंचायत कर्मचारी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या अभियानाची सुरुवात २०२२ साली झाली असून, तेव्हा पासून हे स्वतंत्रता सप्ताहाचा अविभाज्य भाग बनले आहे. या वर्षी तीन टप्प्यांत हे अभियान राबविण्यात येत आहे. पहिला टप्पा २ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट, दुसरा टप्पा ९ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट आणि तिसरा व अंतिम टप्पा १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट असा आहे.
