Saturday, October 25, 2025
Homeऔरंगाबादखोडसाळपणे वीज खंडित, अज्ञातावर गुन्हा दाखल

खोडसाळपणे वीज खंडित, अज्ञातावर गुन्हा दाखल

खोडसाळपणे वीज खंडित, अज्ञातावर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : विद्युत यंत्रणेत खोडसाळपणे छेडछाड केल्याने तब्बल पाच तास  वीजपुरवठा खंडित झाल्याची घटना जिन्सी पोलिस ठाणे परिसरात घडली. याप्रकरणी महावितरणचे सहायक अभियंता संभाजी अथरगण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

         9 एप्रिल रोजी 33 केव्ही बायजीपुरा उपकेंद्रातून निघणाऱ्या 11 केव्ही रोशनगेट फीडरवरील नागसेन रोहित्रावर केबलला आग लागली. त्यामुळे नवाबपुरा शाखा कार्यालयातील तंत्रज्ञ भालेराव यांनी रात्री 9.59  वाजता हे फीडर बायजीपुरा उपकेंद्रातून बंद करण्यास सांगितले. त्यानुसार उपकेंद्रातील यंत्रचालक अब्दुल मुखीत यांनी फीडर बंद करून दिले. त्यानंतर भालेराव यांनी रोहित्रावरील ए.बी. स्विच बंद करून फीडर चालू करण्यासाठी यंत्रचालक मुखीत यांना सांगितले. मुखीत यांनी 10.05 वाजता ट्रायल घेतली असता फीडर चालू झाले नाही आणि उपकेंद्रात या फीडरवर खूप मोठा स्पार्क झाला. त्यानंतर सहायक अभियंता अथरगण यांनी नवाबपुरा व शहागंज शाखा कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह वाहिनीची पूर्ण पाहणी केली असता बिघाड आढळून आला नाही. त्यामुळे पुन्हा ट्रायल घेतली तरी फीडर सुरू झाले नाही. महावितरणचे कर्मचारी लाइनवरील एक-एक केबल तसेच सोडून बिघाड शोधण्याचा प्रयत्न करत होते. नंतर मध्यरात्री 2.17 वाजता जिन्सी पोलिस ठाण्यासमोर रोहित्रावरील रिंग मेन युनिटचा अर्थ स्विच अज्ञात इसमाने खोडसाळपणे तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रोशनगेट फीडरचा वीजपुरवठा 10.05 ते 3.01 वाजेपर्यंत तब्बल 5 तास खंडित राहिल्याने वीजग्राहकांना नाहक त्रास झाला तसेच महावितरणचे 1 लाख 2 हजार 400 रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी सहायक अभियंता संभाजी अथरगण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments