Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादखिर्डी येथील ग्रामसेविकेकडुन माहिती देण्यास टाळाटाळ, खुलताबाद पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू

खिर्डी येथील ग्रामसेविकेकडुन माहिती देण्यास टाळाटाळ, खुलताबाद पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू

खिर्डी येथील ग्रामसेविकेकडुन माहिती देण्यास टाळाटाळ, खुलताबाद पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू

खुलताबाद /प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील खिर्डी येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक विकास योजने अंतर्गत सन २०२२-२३ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या चार लाख रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामावर वाद निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत खिर्डी अंतर्गत बौद्धवाडा दलित वस्तीसाठी मंजूर निधीसाठी २४ नोव्हेंबर २०२२ रोजी नकाशा सादर करण्यात आला होता. मात्र या कामाची माहिती अर्जदार कृष्णा भावराव चव्हाण यांनी वेळोवेळी मागवून ही ग्रामसेविका जे. व्ही. पुलकंठवार यांनी दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.या बाबत चव्हाण यांनी १७ फेब्रुवारी, १९ फेब्रुवारी आणि ३१ मार्च २०२५ रोजी लेखी अर्ज सादर केले होते.प्रशासना कडून दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांनी सोमवार (दि. पाच) पासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणात संदीप मुनवर.व सोमीनाथ निकाळजे यांचा ही सहभाग आहे.या पार्श्वभूमीवर पंचायत समितीने ग्रामसेविका व सरपंच यांना तीन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. स्थळ पाहणी पंचनामा, कामाचा फलक आणि काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र यांची माहिती अर्जदारास तातडीने देण्याचे निर्देश ही देण्यात आले आहेत. मात्र,गटविकास अधिकारी यांच्या आदेशाला ही ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.दरम्यान,या संदर्भात गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, “उपोषणकर्त्यांना संबंधित माहिती लवकरच देण्यात येणार असून त्यांचे समाधान होईल, अशी अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments