कट कट गेटचे अपूर्ण काम तात्काळ पूर्ण करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी
छत्रपती संभाजीनगर/ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) युवक शहर उपाध्यक्ष अशफाक जमील खान यांनी कट-कट गेट परिसरातील अपूर्ण असलेले रिपेअरींगचे काम त्वरित पूर्ण करावे तसेच परिसराची योग्य साफसफाई करण्यासाठी महानगरपालिकेला निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या संदर्भात दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले की, शहरातील 52 दरवाजांचे रिपेअरींगचे काम महानगरपालिकेमार्फत सुरू केले गेले होते, मात्र कट-कट गेटचे काम मध्येच थांबविण्यात आले असून ते अद्याप अपूर्ण आहे.
गेटमध्ये सुशोभीकरण, जाळी बसविणे, झाडे लावणे यासह अन्य कामे प्रलंबित आहेत. देखरेख नसल्याने परिसरात घाण साचली असून जंगली झाडेही मोठ्या प्रमाणात वाढली आहेत, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.