Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादकेंद्रीय सामाजिक न्याय मंत्री विरेंद्र कुमार यांचे हस्ते सफाई कामगारांना किटचे...

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री विरेंद्र कुमार यांचे हस्ते सफाई कामगारांना किटचे वितरण

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री विरेंद्र कुमार यांचे

हस्ते सफाई कामगारांना किटचे वितरण

 

छत्रपती संभाजीनगर – केंद्रीय सामाजिक  न्याय मंत्री विरेंद्र कुमार यांचे हस्ते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेस कीटचे हस्तांतरण करण्यात आले.

एमजीएम महाविद्यालय येथील रुख्मिणी सभागृह येथे आज केंद्रीय मंत्री श्री. कुमार यांच्या हस्ते ड्रेनेज सफाई कामगारांना पीपीइ किटचे वितरण करण्यात आले. सामाजिक न्याय व अधिकारिता विभाग,भारत सरकार व छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी आमदार अनुराधा चव्हाण, व्यवस्थापकीय संचालक  प्रभातकुमार सिंग, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उप आयुक्त विजय पाटील, लखीचंद चव्हाण, कार्यकारी अभियंता अनिल तनपुरे ,अमोल कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

 

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने ड्रेनेज सफाई कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना व उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांचे त्यांनी यावेळी विशेष कौतुक केले.

मान्यवरांच्या हस्ते एकूण ०५ मजुरांना आयुष्मान कार्डचे वितरण करण्यात आले.

तसेच एकूण १६ ड्रेनेज सफाई कामगारांना पीपीइ किटचे तसेच स्वच्छता उद्यमी योजना अंतर्गत  मंजूर कर्ज पत्राचे वितरण करण्यात आले.

महानगरपालिकेच्या विविध लोकोपयोगी मशिनरीची पाहणी केली व महानगरपालिकेच्या तांत्रिक सुसज्जतेबद्दल समाधान व्यक्त केले.

नमस्ते योजना

सफाई कर्मचाऱ्यांना प्रतिष्ठा मिळावी आणि त्यांना सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने नॅशनल ॲक्शन फॉर

मेकॅनाईज्द सॅनिटेशन इकोसिस्टीम   तयार केले आहे. पुढील तीन वर्षात देशातील सर्व या यंत्रणेची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी ३४९.७० कोटी रुपये खर्च येणार आहे. हा सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री कुमार यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमास सफाई मजूर, स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments