Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादकामचुकार पुरवठा विभागाचे अधिकारी यांची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी नागरिकांतून होत...

कामचुकार पुरवठा विभागाचे अधिकारी यांची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे

कामचुकार पुरवठा विभागाचे अधिकारी यांची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे

    पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांचे हाल
तहसीलदार स्वरुप कंकाळ यांचे पुरवठा विभागाचे अधिकाऱ्यावर
नियंत्रण नसल्यामुळे या अधिकारी मनमानी कारभार करताना दिसत आहे. अशी चर्चा तहसील परिसरात नागरिक करताना दिसत होते
    खुलताबाद पुरवठा विभागाचा कारभार बेशिस्तपणे चालेल असून अनेक वेळा तक्रारी करून फक्त कर्मचाऱ्यांना समज देऊन सोडले जाते, त्यामुळे कर्मचाऱ्यांना धाक नसल्याने मनमानी करभार केला जात आहे
खुलताबाद / प्रतिनिधी /खुलताबाद येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे तहसीलदार यांचे या कामचुकार अधिकारी व कर्मचारी यांचेवर नियंत्रण नसल्यामुळे खुलताबाद तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मनमानीपणे वेळा ठरवत असल्याचे चित्र दिसून येत आहे
काही कर्मचारी दुपारी २ वाजता उपस्थित होतात, तर काही चार वाजताच कार्यालय सोडतात, अशी तक्रार नागरिकांमधून व्यक्त होत आहे सध्या तापमानात मोठी वाढ झालेली असून विविध कामांसाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना उन्हात अधिकाऱ्याची वाट बघावा लागत आहे
पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या या निष्काळजीपणामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे
यासंदर्भात नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून,संबंधित कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यात यावी,अशी  मागणी होत आहे. तहसीलदारांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शिस्तीचा बडगा उगारण्याची गरज आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments