कडेठाण येथील महालक्ष्मीच्या मंदिराचा कलशारोहण सोहळा संपन्न
छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांची प्रमुख उपस्थिती,
आत्ताच एक्सप्रेस
पैठण /प्रतिनिधी / पैठण तालुक्यातील कडेठाण हे कोल्हापुर येथील श्री महालक्ष्मीचे उपपीठ असलेले श्री क्षेत्र कडेठाण येथील श्री महालक्ष्मीच्या मंदिराच्या कळस पूजन सोहळा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे खासदार संदिपान भुमरे.व सत्यनारायण अग्रवाल,अतुलराव गावंडे,धनंजय तवार, आशिष काळुशे,यांच्या हस्ते कलश रोहणाची पूजा संपन्न झाली यावेळी पैठणचे आमदार विलास बापू भुमरे. पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजू नाना भुमरे व भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मंदिरावर पूर्वी कळस नव्हता
हे मंदिर इसवीसन बाराव्या शतका अगोदर बांधले असावे असा उल्लेख महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी लिखित निळा चरित्र व स्थान पोथी या ग्रंथात आढळते
कळसाचे जुने अवशेष सापडले
इसवी सन २०१० साली मंदिर अंतर्गत जीर्णद्वाराचे काम चालू असताना खोदकामात साधारणता आठ ते दहा फुटावर खोल जमिनीत कळसाचे पंचधातूचे अवशेष सापडले हा कळस पंचधातूपासून बनवलेला असून तो जीर्ण झालेल्या अवस्थेत आढळला
त्याची जोडणी केली असता तो कोल्हापुर येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या शिखरावरील कळसाप्रमाणेच आहे असे लक्षात आले म्हणून समस्त गावकरी व भक्तमंडळीच्या सहकार्याने विश्वस्त मंडळाने या मंदिरावर ५१ फूट उंचीचे शिखर करण्याचा निर्णय घेतला होता व आज तो पूर्ण झाला आहे.
हे शिखर जे कोल्हापुर येथील श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरावर आहे त्याप्रमाणेच डिझाईन घेऊन तयार करण्यात आली आहे शिखरावर पाच फुट चार इंच उंचीचा पंचधातूचा नवीन कळस बसविला आहे.
हे काम राजस्थान येथील बंसी पहाड या गुलाबी रंगाच्या दगडामध्ये केली आहे.
कळसाचा खर्च पंचक्रोशीतील गावकरी व बाहेरील भाविक भक्तगण यांच्या आर्थिक सहकार्याने केला आहे
या कळस पूजन सोहळ्यानिमित्त कडेठाण परिसरातील प्रत्येक गावातील बाहेरगावी दिलेल्या मुली त्यांनी कळसासाठी आपापल्या परीने संपूर्ण मुलीने देणगी दिली आहे व सगळ्या परगावी दिलेले मुली व जावई मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते मंदिर संस्थांनच्या वतीने त्यांचा सर्वांचा सत्कार करण्यात आला व संस्थांनच्या वतीने त्यांना आहेर म्हणून प्रत्येकी एक पैठणी साडी व सोहळे आणि सोन्याची मुलामा असलेली श्रींची प्रतीमा भेट म्हणून देण्यात आली. या कळस रोहन सोहळा निमित्त सगळ्या मैत्रिणीची आज भेट झाली आज कडेठाण व परिसरात दिवाळी सारखा मोठा सण साजरा करण्यात आला दुपारी अडीच वाजता कलशारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला व नंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम झाला.