कायगाव देवगाव रस्त्यावर अवतरले लाकूडमाफिया, विनापरवानगी होतेय दिवसाढवळ्या वृक्षतोड
वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे कानावर हात म्हणतात वृक्षतोडीचा परवाना काढलेला नाही झाडांचे वय अंदाजे ८० ते ९० वर्ष…
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर /प्रतिनिधी/ गंगापूर तालुक्यातील ३९ राज्यमार्ग कायगाव/देवगाव रस्त्याचे काम प्रगतीपथावर चालू आहे त्यामुळे रस्त्याच्या कामात आड येणाऱ्या ८० ते ९० वर्षांपूर्वीची झाडांची खुलेआम कत्तल होत आहे वनविभागाची कुठलीही परवानगी न घेता खुलेआमपने तोडण्याचा सपाटा सदर ठेकेदाराने चालवला असल्याची माहिती समोर येत असून याबावत वनविभागाचे वनरक्षक नारायण चाथे यांच्याशी संपर्क साधला असता वनविभागाकडून कुठलीही लेखी परवानगी घेतली नसल्याची माहिती देऊन आमच्याकडे लेखी तक्रार आली तरच आम्ही कारवाई करू असेही दैनिक आत्ताच एक्सप्रेस चे प्रतिनिधीशी बोलताना संगितले आहे त्यानंतर वनपाल अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाहू कारवाई करू असे थातूरमातूर उत्तर दिले.दरम्यान या रस्त्यावरील वड, लिंब,चिंच,बाभूळ, खैर आदी झाडांची कत्तल झाली असून या झाडांची वयोमान तब्बल ८० ते ९० वर्षाचे असल्याचे जुने जाणकार वृद्ध माणसे सांगत आहे मात्र वन विभागाची परवानगी न घेता या झाडांची कत्तल करीत आहे येथील लोकप्रतिनिधी व संबंधित वनविभागाचे अधिकारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे
देवगाव ते कायगाव टोका राज्यमार्ग क्रमांक ३९ चे काम प्रगतीपथावर चालू आहे मात्र आमच्या लहानपणापासून आम्ही जी झाडे पाहत होतो ती झाडे आमच्या डोळ्यादेखत तुटली गेली याचे मोठे दुःख आहे मात्र हे झाडे तोडताना सदर ठेकेदाराने वनविभागाची कुठलीही परवानगी घेतली नाही हे कसे शक्य आहे याबाबत वन विभागाचे वनरक्षक नारायण चाथे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सदर ठेकेदारांनी कुठलीही परवानगी झाडे तोडण्याची आमच्याकडून परवानगी घेतलेली नाही त्यामुळे सदर ठेकेदारावर कारवाई कोण करणार आहे आसा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे विनापरवानगी झाडे तोडल्यामुळे सदर ठेकेदारावर कारवाई होणे गरजेचे आहे नुसता उपवनसंरक्षक कार्यालयासमोर आम्ही उपोषणास बसणार आहे.
( विजय तुपे मा सरपंच व तथा उपसरपंच माळीवाडगाव )
ठेकेदाराशी “लाख”मोलाचे अर्थपूर्ण संबंध जोपासणारा वनविभागाचा तो अधिकारी कोण……?
सदर ठेकेदारांनी एका वनविभागाच्या अधिकाऱ्यासोबत “लाख” मोलाचे अर्थपूर्ण संबंध जोपासत खुलेआम विनापरवाना वृक्षतोड बेकायदेशीरपणे चालू आहे यासाठी वनविभागाच्या एका अधिकाऱ्याला अर्थपूर्ण “लाख” मोलाची भेट संबंधित ठेकेदारांनी दिली असल्याची माहिती गोपनीय सूत्रांमार्फत मिळाली असून ठेकेदाराकडून लाख मोलाची भेट स्वीकारणारा तो वनविभागाचा अधिकारी कोण याची चर्चा तालुकाभरात चालू आहे