आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर तालुक्यातील माळीवाडगांव येथे देवगाव ते कायगाव रस्त्यावरील मुरूमाच्या ढिगाऱ्यावर जाऊन नांगरे बाभुळगाव येथील दूध उत्पादक शेतकरी दत्तू थोरात हे जबर जखमी झाले होते त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र गेली चार दिवस त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली व सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.दरम्यान कायगाव ते देवगाव रस्त्याचे काम चालू असून जागोजागी रसत्याच्या कामासाठी खडी, वाळूचे ढिगारे ठेकेदाराने टाकलेले आहे हे ढिगारे अंधारात वाहनधारकाला दिसत नसल्याने अनेक अपघात होत आहे गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नांगरे बाभूळगाव येथील दूध उत्पादक शेतकरी दत्तू जनार्धन थोरात (वय, ४५ वर्ष ) हे माळीवाडगाव येथे दूध घालण्यासाठी दूध डेअरी येथे आले होते दूध घातल्यानंतर बाभुळगावकडे मोटरसायकलवर जात असताना वळई नदीजवळ भरस्त्यात असणाऱ्या वमुरूमच्या ढिगाऱ्यावर दुचाकी जाऊन रस्त्यावर पडली त्यामुळे दत्तू थोरात यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिव्र रक्तश्रव होऊन गंभीर जखमी झाल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात हालवण्यात आले होते मात्र सोमवारी उपचारादरम्यान तुमची मृत्यूची झुंज अपयशी झाली व ते मृत्यू पावले.