Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादकेसर जवळगा वाद प्रकरण — महा पोलीस मित्र संघाच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे शांततापूर्ण...

केसर जवळगा वाद प्रकरण — महा पोलीस मित्र संघाच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे शांततापूर्ण तोडगा

केसर जवळगा वाद प्रकरण — महा पोलीस मित्र संघाच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे शांततापूर्ण तोडगा

सुखापूरी/प्रतिनिधी/  केसर जवळगा परिसरातील वाद प्रकरणात महा पोलीस मित्र संघ यांनी तात्काळ पुढाकार घेत समाजातील तणाव शांत करत दोन्ही बाजूंमध्ये समाधानकारक तोडगा काढला आहे. संघाच्या सक्रिय हस्तक्षेपाचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केसर जवळगा येथे दोन पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती चिघळू नये तसेच वाद वाढू न देता प्रश्नाचे मूळ स्वरूप समजून घेण्यासाठी आज महा पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य संघाने आष्टा कासार येथील संबंधित मुलीच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट दिली. संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी दोन्ही पक्षांकडील माहिती शांतपणे ऐकून घेतल्याचे सांगण्यात आले.
यानंतर हे प्रकरण तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत दोन्ही बाजूंशी चर्चा करून हाताळण्यात आले. संयमित चर्चेनंतर दोन्ही पक्षांनी आपापल्या बाजू मांडल्या आणि समितीच्या मार्गदर्शनाखाली प्रकरण मैत्रीपूर्ण पद्धतीने निकाली काढण्यात आले.
संघाच्या तात्काळ कारवाईमुळे व न्याय्य मध्यस्थीमुळे हा वाद कोणताही ताण-तणाव न वाढता शांततेत मार्गी लागला. या हस्तक्षेपामुळे परिसरात पुन्हा शांततेचे वातावरण निर्माण झाल्याचा आनंद स्थानिक नागरिकांसह महा पोलीस मित्र संघाने व्यक्त केला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments