कसाबखेड्यातील सहा वर्षांच्या अरमानचा पहिला रोजा पूर्ण
खुलताबाद/प्रतिनिधि/ खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा येथील अरमान जाकिर कुरेशी या अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकल्याने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा (उपवास) पूर्ण केला.लहान वयातही त्याने दाखवलेल्या श्रद्धा आणि संयमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.अरमानने पूर्ण दिवस उपवास ठेवून धार्मिक परंपरेचे पालन केले.कुटुंबियांनी त्याचे उत्साहाने अभिनंदन केले.विशेषतः मामा मुख्तर कुरेशी यांनी अरमानचे भरभरून कौतुक केले. नातेवाईक त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
लहान वयातच धार्मिक संस्कार जोपासल्याबद्दल गावात आनंदाचे वातावरण आहे.अरमानच्या या प्रयत्नामुळे कुटुंबाचा अभिमान अधिकच वाढला आहे.
