प्रति, माननीय संपादकजी,
विषय:- कर्नल सोफिया कुरेशी बाबद घृणास्पद वक्तव्य करणाऱ्या विजय शाहवर देशद्रोहाचा खटला दाखल करावा.
आज भारतीय सेनेने पाकिस्तानमध्ये घुसून केलेली आतंकवाद विरोधी कारवाईचे संपूर्ण भारत स्वागत करीत आहे तर दुसरीकडे संपूर्ण भारतीय सेनेच्या कारवाईचे संपूर्ण जग आश्चर्यचकित कौतुक करीत आहे.यामुळे अमेरिका, चीन, तुर्की हादरून गेला आहे.सोबतच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रक्षा मंत्री राजनाथ सिंग भारतीय सेनेचे मनोबल वाढविण्यासाठी सीमावर्ती भागात थेट भेट देत आहेत. परंतु भारतातील निर्लज्ज नालायक मध्यप्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री विजय शहा यांनी वादग्रस्त वक्तव्य करून निर्लज्जतेची हद्द पार केली आहे. देशातील सैनिक असो अथवा सैन्य अधिकारी हा देशाचा कणा आहे.शाहनी लक्षात ठेवले पाहिजे की शेतकरी हा अन्नदाता, कामगार हा शिल्पकार व भारतीय स्थल,जल व वायू सेना ही देशाचा कणा आहे.कारण सेना देशाच्या १४० कोटी जनतेसाठी तहानभूक,उन, पाऊस,वादळ विसरून २४ तास देशाच्या सिमेवर उभा राहुन देशाची सेवा करतो व आपली ढाल बनून रक्षण करतो.माझ्यामते विजय शहाचे घृणास्पद वक्तव्य सन्माननीय कर्नल सोफिया कुरैशी पुरते सिमीत नसुन संपूर्ण भारतीय सैन्यावर घनाघाती प्रहार आहे.त्यामुळे केंद्र सरकारने विजय शाह बद्दल कठोर निर्णय घेऊन आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावलीच पाहिजे.कारण त्यांचे हे घृणास्पद वक्तव्य देशाच्या १४० कोटी जनतेच्या हृदयात मोठी जखम करून बसली आहे.उच्चपदस्थ राजकीय पुढारी मध्यप्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री विजय शाह एका जाहीर कार्यक्रमात म्हणाले की, ज्यांनी आपल्या मुलींचे कुंकू पुसले होते, त्या लोकांना आम्ही त्यांच्याच बहिणीला पाठवून चांगलाच धडा शिकवला.त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारले,तर मोदीजींनी त्यांच्याच समाजातील बहिणीला पाठवले की, जेणेकरून ज्यांनी आमच्या बहिणी विधवा केल्या त्यांना त्यांच्या समाजातील बहीण नग्न करून सोडल.अशाप्रटारचे बेताल वक्तव्य करून विजय शाहनी बेशरमीची हद्द पार केली. असे वक्तव्य करतांना शाहला थोडीशी तरी शर्म वाटायला पाहिजे की भारतातील हिंदू-मुसलमान एक आहे आणि अनंत काळापर्यंत एकत्र राहील हीच भारताची मोठी उपलब्धी आहे.त्यामुळे शाह सारख्या व्यक्तीला देशातील कोणत्याही संविधानिक पदावर रहाण्याचा अधिक नाही. आज विजय शहा यांच्यावर कठोर कारवाई होने अत्यंत गरजेचे आहे.कारण सरकारने जर विजय शहा यांच्यावर कठोर कारवाई केली तर देशातील प्रत्येक तळागाळातील राजकीय पुढारी थोर पुरुषांबद्दल, स्वतंत्र सैनिकांबद्दल किंवा आपल्या पुर्वजांबद्दल बेजबाबदार वक्तव्य करतांना हजार वेळा विचार करेल.त्यामुळे आजच्या परिस्थितीत विजय शहा यांच्यावर कठोर कारवाई होने अत्यंत गरजेचे आहे.कारण त्यांनी देशाच्या रक्षणकर्ता सैन्यावर व सैन्य शक्तीवर मोठा प्रहार करून ताशेरे ओढले आहेत ही बाब देशातील १४० कोटी जनता कदापि सहन करणार नाही. विजय शाहला कल्पना नसेल की की आज भारतात सर्वधर्मसमभाव असल्यामुळे भारत विश्व शांतीचा दुत बनला आहे ही बाब शाहने लक्षात ठेवली पाहिजे.आज भारतात हिंदू, मुस्लिम,शिख,ईसाई, बौद्ध हे संपूर्ण एकोप्याने राहतात आणि जगाच्या पाठीवर भारत असा एकमेव देश आहे की याठिकाणी सर्वच धर्माचे, पंथाचे,जातीचे लोक एकोप्याने राहतात आणि सर्वच आपापल्या संस्कृतीचे पालन करतात.त्यामुळेच संपूर्ण जग भारताकडे चांगल्या दृष्टीने पहातात व विदेशातील लोक भारतात भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी येतात.परंतु विजय शाह सारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्या नालायक लोकांना कोणत्याही राजकीय पक्षात किंवा कोणत्याही पदावर रहाण्याचा अजीबात अधिक नाही असे मला वाटते.२०१३ मध्ये शिवराजसिंह चौहान यांच्या पत्नी साधना यांच्याविषयी वादग्रस्त टिप्पणी केल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.यावरून स्पष्ट होते की, विजय शाह यांनी निर्लज्जतेची संपूर्ण हद्दपार केली आहे.त्यामुळे त्यांच्यावर ताबडतोब देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा ठोठावली पाहिजे. सध्या देशात राजकीय पोळी शेकण्यासाठी राजकीय पुढारी विद्वेषी वक्तव्य देण्याचे प्रकार वाढले आहेत.यावर आवर घालण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिनांक २८ एप्रिल २०२३ ला सुप्रीम कोर्टाने आदेश काढला होता की विद्वेषी वक्तव्ये करणारे यांची कोणी तक्रार करेल याची वाट न पाहता राज्यांनी कारवाई करावी.त्या कृतीस विलंब झाला तर तो कोर्टाचा अवमान समजला जाईल असे सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात बजावले आहे.याच आधारे देशाचा, देशाच्या सैन्य शक्तीचा व १४० कोटी जनतेचा अपमान करणाऱ्या राक्षसाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे.असे जर झाले तर विद्वेषी वक्तव्ये किंवा घृणास्पद किंवा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांच्या जिभेवर आपोआप आवर बसेल.विजय शाह यांनी अशा वेळेस गलिच्छ भाषेत वक्तव्य केले आहे की,आपण आपल्या दुष्मन राष्ट्र पाकिस्तान विरूध्द चांगली लढत देत आहोत आणि त्याला धाराशाही करण्याचे काम कर्नल सोफिया कुरैशी व भारतीय सेनेने केले त्यांच्यापुढे संपूर्ण भारत नतमस्तक आहे.आता घृणास्पद वक्तव्य अंगलट आल्या बरोबर मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह म्हणतात की, माझ्या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दहा वेळा माफी मागायला तयार आहे.कर्नल सोफिया कुरैशी यांच्या बद्दल मला बहिणीपेक्षा अधिक आदय वाटतो.शाहला आता येवढा आदर वाटत आहे तेव्हा बोलतांना थोडीशीही शरम का आली नाही?शाहला लाज वाटायला हवी की सोफिया कुरैशी ही प्रथम भारतीय महिला आहे आणि आता देशाची ढाल आहे.त्यामुळे विजय शाह सारख्या बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या गुन्हेगाराला माफी नकोच त्यावर एकच उपाय ती म्हणजे कठोर शिक्षा,असे जर झाले तर देशातील बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांवर आपोआप आवर बसेल यावर महामहीम राष्ट्रपती, सुप्रीम कोर्ट,प्रधानमंत्री, लोकसभा अध्यक्ष, उपराष्ट्रपती यांनी याबाबतीत गांभीर्याने दखल घ्यावी अशी मी या लेखाच्या माध्यमातून सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो.कारण बेजबाबदार वक्तव्य करणारे राजकीय पुढारी देशासाठी घातक असतात कारण यामुळे समाजात विष पसरत असते असे मला वाटते.सन्माननीय कर्नल सोफिया कुरेशी व संपूर्ण सैन्य शक्तीला माझा कोटी-कोटी सलाम.जय हिंद, जय भारत.
- रमेश कृष्णराव लांजेवार