लेखी आश्वासनानंतर करंजखेडा येथील उपोषण मागे
कन्नड / प्रतिनिधी/रस्ता दुरुस्ती कामासाठी चार दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग व कृष्णा सहाणे हे गावातील काकासाहेब देशमुख चौकात उपोषणाला बसले होते. प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.
सोमवारी दुपारी सा.बां.चे कनिष्ठ अभियंता पी.आर. हिवराळे व नायब तहसीलदार एस.एस. उंगले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तसेच त्यांना लेखी आश्वासन दिले. यानंतर भुजंग व सहाणे यांनी उपोषण स्थगित केले.यावेळी उपोषण स्थळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे कार्यकर्ते व उद्योजक मनोज पवार, सामाजिक कार्यकर्ते गजानन गवळी, माजी उपसरपंच हर्षवर्धन निकम, शंकर गवारे, व्ही.टी. पाटील, कलीम पेंटर, बद्रीनाथ गाढवे, विष्णू पालोदकर, भुसारे, सय्यद मुत्तोजोद्दिन अल्पसंख्याक अध्यक्ष नवाब शेख आदी उपस्थितीत होते.