Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादकरंजाळा येथे ऊसतोड कामगार व बालकांना हिवाळ्यात उबदार मदतीचा हात

करंजाळा येथे ऊसतोड कामगार व बालकांना हिवाळ्यात उबदार मदतीचा हात

करंजाळा येथे ऊसतोड कामगार व बालकांना हिवाळ्यात उबदार मदतीचा हात

 सुखापूरी/प्रतिनिधी/ सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे. अशा थंडीत ऊसतोड कामगार व त्यांचा परिवार एका छोट्याशा झोपडीत राहतात. दिवसभर शेतात कठोर परिश्रम करूनही त्यांच्याकडे हिवाळ्यातील संरक्षणासाठी आवश्यक साधनांची कमतरता असते. ही गरज लक्षात घेऊन हंस फाउंडेशनतर्फे करंजाळा येथे उबदार सेवा उपक्रम राबवण्यात आला. या मोहिमेअंतर्गत प्रौढ ऊसतोड कामगारांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले, तर थंडीने थरथरणाऱ्या छोट्या मुलांना स्वेटर देण्यात आले.
वितरणाच्या वेळी अनेक महिला, वृद्ध आणि मुलांच्या चेहऱ्यावर दिसलेले समाधानाचे भाव या उपक्रमाचे सर्वांत मोठे यश ठरले.
हंस फाउंडेशन अनेक वर्षांपासून समाजातील अंध, अपंग, निराधार, विधवा, गरीब व ऊसतोड कुटुंबांसाठी सेवा उपक्रम राबवत आहे. “समाजातील कोणताही जीव थंडीने कापू नये” या भावनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यासाठी दूरदूरवरून अनेक दानशूर नागरिकांनी मनापासून मदत केली. आर्थिक मदत, चादरी, स्वेटर, ब्लॅंकेट तसेच साहित्याच्या स्वरूपात अनेकांनी हातभार लावला.
उपक्रम यशस्वी झाल्यानंतर गावकऱ्यांनी आणि ऊसतोड कामगारांनी हंस फाउंडेशनचे आभार व्यक्त केले. यावेळी संस्थेचे माऊली दोबोले, महादेव शिंगटे, जालिंदर चोरमले, गोविंद कोळेकर, मा. सरपंच शिवाजी बाम्हणे, योगेश हेंद्रे, नीलकंठ नांद्रे आदी गावकरी तसेच ऊस कामगार उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments