Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादकरंजखेडा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संवाद दौऱ्याची आयोजन करण्यात आले...

करंजखेडा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संवाद दौऱ्याची आयोजन करण्यात आले होते

करंजखेडा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संवाद दौऱ्याची आयोजन करण्यात आले होते

कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील करंजखेड  उमेदवार हा दुसरा तिसरा कोणी नसून मशालच उमेदवार आहे व मशाल चिन्ह घेऊन मतदारापर्यंत जा विजय निश्चितच आपला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सर्वसामान्य व शेतकऱ्यांच्या हितासाठी व उज्वल भविष्यासाठी कटिबंध्द आहे.करंजखेड जिल्हा परिषद गटातून प्रकाश गाडेकर हे इच्छुक असून प्रकाश गाडेकर हे माझे जुने मित्र असून त्यांचा स्वभाव हा शिवसेनेचा आहे.शिवसेनेतच असे धडक बेधडक लोक तयार झालेले आहेत.जे आहे ते मागे न बोलता तोंडावर बोलण्याची सवय,रोखठोक बोलण्याची सवय प्रकाश गाडेकर यांच्यामध्ये आहे. लोकांसाठी व लोकांमध्ये राहून काम करणारा प्रकाश गाडेकर आहे.स्वतःचा नाही तर मतदारांचा,कार्यकर्त्यांचा विचार करणारा प्रकाश गाडेकर आहे.आज अनौपचारिक प्रवेश त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात झालेला असून नगरपालिका निवडणुकीनंतर मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नक्कीच पक्षप्रवेश करू असे प्रतिपादन माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. ते करंजखेड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित संवाद दौऱ्यात बोलत होते. यावेळी उपस्थित माजी आमदार उदयसिंह राजपूत यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की, प्रकाश गाडेकर यांचा स्वभाव हा रोखठोक असून लोकांमध्ये मिसळून लोकांसाठी काम करण्याची सवय प्रकाश गाडेकर यांना आहे. स्वतःचा नाही तर दुसऱ्याचा विचार करणारा असा नेता प्रकाश गाडेकर आहे.येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मशाल हे चिन्ह घेऊन मतदारापर्यंत जाऊन जास्तीत जास्त आपल्या पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला.यावेळी शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब मोहिते,तालुकाप्रमुख संजय मोटे,शिवसेना महिला आघाडीच्या सरपंच रूपाली मोहिते,करंजखेड गावाचे माजी सरपंच हय्यास सय्यद,उपतालुकाप्रमुख संजय राजपुत, मेघश्याम शेठ तायडे,विठ्ठल मनगटे,विभाग प्रमुख अनिल चव्हाण,उपविभाग प्रमुख बाबुराव सोनवणे,नाना येवले,रामेश्वर ताजने,अंबादास जाधव,आप्पा बोराडे, योगेश जंजाळ,विलास निकम,नाशिकराव काळे,शिवाजी नागोडे, कृष्णा सहाने,एकलव्य संघटनेचे मराठवाडा प्रमुख रमेश माळी,एकनाथ मोरे,चिमणापूरचे सरपंच परमेश्वर सोळुंके,माजी सरपंच रवींद्र ढोणे,आप्पासाहेब देशमुख, नामदेव अहिरे,रोहिदास ढोणे,ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर जाधव,ममराज पवार,सचिन जाधव,सागर मातेरे,नथ्थु गांगड,मुजाहिद खान,परवेज खान, जावेद शेख,ओंकार पवार,पुनमचंद पवार, रामचंद्र चव्हाण,नितीन राठोड,गोकुळ सोळुंके विलास मोटे,अनिल सपकाळ,सौरभ ढोणे,विनोद सोळुंके,अतुल सोळुंके, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक‌ व करंजखेड परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments