मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त
विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण
छत्रपती संभाजीनगर, दि.१७ : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, सहआयुक्त देविदास टेकाळे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री.पापळकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
