खा.भागवत कराड यांनी घेतले भगवान शांतीनाथांचे व आचार्य प्रणामसागरजी महाराज यांचे दर्शन
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी/ खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर राजाबजार येथे आचार्य प्रणासागरजी महाराज यांचा २०२५ चा चातुर्मास मोठया उत्साहाने सुरâ असुन रोज विविध धार्मिक कार्यकमांचे आयोजन करण्यात येत आहे. नुकतीच माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री खा.भागवत कराड यांनी राजाबजार जैन मंदिराला भेट देवुन भगवान शांतीनाथांच्या चरणी श्रीफळ अर्पण करâन भगवंताचे दर्शन घेतले. यावेळी येथे वास्तव्यास असणा-या आचार्य प्रणामसागरजी महाराज यांचे दर्शन घेवुन त्यांच्याशी वार्तालाब केला. यावेळी आचार्यश्रींनी भागवत कराड यांना आर्शिवाद देतांना सांगीतले की, तुम्हाला जे पद मिळाले आहे हे लोकांची सेवा करण्यासाठी व जन सेवेसाठी मिळाले आहे. तुमचे कर्तुत्व असल्यामुळे तुम्हाला हे सर्वोच्च पद मिळाले आहे. तरी या पदाचा मान राखुन तुम्ही सदैव राष्ट्राची, देशाची, गुरâजनांची व जनतेची सदैव सेवा करा. असे सांगीतले. या प्रसंगी भागवत कराड यांनी आचार्यश्रींचे दर्शन घेवुन सांगीतले की, आचार्यश्री आपण जो आर्शिवाद दिला आहे. त्या आर्शिवादाला योग्य उतरण्यासाठी मी सैदव प्रयत्न करेल व आपण सांगीतल्या प्रमाणेच सदैव जनसामान्यांची राष्ट्राची,देशाची व गुरâजनांची सेवा करत राहील असे सागीतले. यावेळी खंडेलवाल दिगंबर जैन पंचायतच्या वतीने भागवत कराड यांचा शाल,श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवुन सचिव प्रकाश अजमेरा व किरण पहाड़े यांनी सत्कार केला कार्यकमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन पंचायतचे सचिव प्रकाश अजमेरा यांनी केले. यावेळी प्रकाश अजमेरा यांनी खा.भागवत कराड यांना येत्या चार महिन्यात चातुर्मास काळात होणा-या विविध कार्यकमात आपली उपस्थिती सदैव प्रार्थनिय राहील असे सांगीतले.