शासकीय कापुस विक्रीसाठी शेतक-यांनी तयारी करावी – सभापती जयदत्त नरवडे
माजलगाव/प्रतिनिधी/ शासकीय कापुस खरेदी केंद्रावर कापुस विक्री करण्यासाठी शेतक-यांनी २०२५ – २६ या हंगामाकरीता सर्व कागदपत्रांसह तयारी करावी असे आवाहन बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे, उपसभापती श्रीहरी मोरे, सचिव हरिभाउ सवणे यांनी केले आहे.
सन २०२५ – २६ या कापूस हंगामाकरीता शासनाच्या हमीदराप्रमाणे सि. सी.आयच्या वतीने शासकीय कापुस खरेदी ८११० रूपये एवढा निश्चीत करण्यात आला आहे. शेतक-यांनी शासकीय कापुस खरेदी केंद्रावर कापुस विक्री करण्यासाठी कापसाची ई – पिक पाहणी करणे आवश्यक आहे ,सात – बारावर कापसाची नोंद असणे आवश्यक आहे,कापुस खरेदी सर्व पेमेंट आधार लिंक असलेल्या बॅंक खात्यात केले जाईल,त्याकरीता बॅंक खात्याला आधार लिंक करणे आवश्यक आहे,त्याचबरोबर आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे. पोस्टल बॅंकेमध्ये खाते असल्यास त्याची पैसे स्विकारण्याची मर्यादा वाढवलेली आवश्यक असुन याची सर्व तयारी करावी तसेच नंतर एैनवेळी धावपळ करण्यापेक्षा व परेशान होण्यापेक्षा रिकाम्या वेळात कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी हे काम करून ठेवा म्हणजे आपला कापुस शासकीय कापुस खरेदी केंद्रावर घालता येईल. त्यामुळे वरिल सर्व प्रक्रिया आताच पुर्ण कराव्यात असे आवाहन बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे, उपसभापती श्रीहरी मोरे, सचिव हरिभाउ सवणे यांनी केले आहे.