Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादकपास किसान मोबाईल ॲपव्दारे शेतकरी बांधवांनी कापुस विक्रीसाठी नोंदणी करावी

कपास किसान मोबाईल ॲपव्दारे शेतकरी बांधवांनी कापुस विक्रीसाठी नोंदणी करावी

कपास किसान मोबाईल ॲपव्दारे शेतकरी बांधवांनी कापुस विक्रीसाठी नोंदणी करावी
अडचण आल्यास बाजार समितीशी संपर्क साधवा
—सभापती नरवडे, उपसभापती मोरे
माजलगाव/प्रतिनिधी/  भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयाच्या वतीने भारतीय कपास निगम लिमिटेड औरंगाबाद यांचे वतीने कपास किसान मोबाईल ॲपची निर्मीती करण्यात आली असुन २०२५ – २६ या पिक वर्षात किमान आधारभूत किमंतीवर कापूस विकण्यासाठी कपास किसान मोबाईल ॲपव्दारे शेतकरी बांधवांनी कापुस विक्रीसाठी नोंदणी करावी काही अडचण असल्यास बाजार समिती कार्यालयात कापूस विभागाशी संपर्क साधल्यास नोंदणी करून देण्यात येईल अशी माहिती बाजार समितीचे सभापती जयदत्त अण्णा नरवडे, उपसभापती श्रीहरी नाना मोरे, सचिव हरिभाउ सवणे यांनी दिली आहे.
माजलगाव तालुक्यातील सर्व कापूस उत्पादक  शेतकऱ्यांसाठी  कापूस हंगाम २०२५ – २६ करीता केंद्र सरकारने हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कापसाची विक्री करण्यासाठी “कपास किसान”नावाचे मोबाईल ॲप दि. ३० ऑगस्ट २०२५ पासून उपलब्ध केलेले आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी “कपास किसान”नावाचे ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून दि. १ सप्टेंबर २०२५ ते दि. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत नोंदणी करून घ्यावी.३० सप्टेंबर ही नोंदणी करण्याची अंतिम मुदत आहे. ३० सप्टेंबर नंतर नोंदणी करता येणार नाही. कापूस पिकाची नोंद करण्यासाठी  सातबारा उतारा, सातबारा उताऱ्यावर कापूस पिकाची नोंद, वैध आधार कार्ड, शेतकऱ्याचा फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवानी कपास किसान मोबाईल ॲपव्दारे  कापुस विक्रीसाठी नोंदणी करावी असे आवाहन बाजार समितीचे सभापती जयदत्त अण्णा नरवडे, उपसभापती श्रीहरी नाना मोरे, सचिव हरिभाउ सवणे यांनी केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments