Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादकन्नड तालुक्यात कांद्याचे बियाणं साठी शेतकऱ्यांची धडपड

कन्नड तालुक्यात कांद्याचे बियाणं साठी शेतकऱ्यांची धडपड

कन्नड तालुक्यात कांद्याचे बियाणं साठी शेतकऱ्यांची धडपड
सततच्या पाण्यामुळे शेतकरी परेशान
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यात सतत सात आठ दिवसापासून, पाऊस वादळ वारे भाग बदलत सुरूच आहेत. शेती मशागत करता करता. थोड्याफार प्रमाणात बाजरी, बियाण्याचा कांदा, मिरची व इतर भाजीपाला शेतकऱ्यांच्या शेतात असला तरी अवकाळी व बेमोसमी पावसाने शेतकरी त्रस्त आहेत. नाजूक असलेले कांदा बियाण्याचे गोंडे ,फुले वेळेत तोडणे, सुकवणे वाळवणे याबाबी सुरू असतानाच वादळवार व पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडत आहेत.  पावसाचा अंदाज घेत पिशोर परिसरातील मोहनद्री येथे  कांद्याच्या गोंड्यांना उन्हाचा चटका देऊन लगेच थ्रेशर,ऊपनेर मशीन मधून बियाणे तयार करताना शेतकरी.पाऊस, वादळ वाऱ्यासारख्या आपत्तीला कोणी रोखू शकत नाही, परंतु कांदा बियाण्याच्या बाबतीत खर्चाच्या तुलनेत व पोलन करणाऱ्या मधुमक्षिका संख्या घटल्याने वजन, उत्पन्न कमी असते, त्यातच असली आपत्ती बिलकुल परवडणारी नाही. यावर्षी कांदा बियाण्याला दर,भाव चांगला आहे .परंतु सतत ढगाळ वातावरण व नकारात्मक वातावरणाचा परिणाम वजनावर झालाय. त्यातल्या त्यात सध्या पाऊस सुरू असल्याने झाकपाक ,उचल पटकला मजुरी वाढत आहे.
माधवराव शंकर जाधव शेतकरी.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments