कन्नडच्या नगराध्यक्षापदी राष्ट्रवादीच्या सौ.रंजनाताई विराजमान
कन्नड :- बंजारा समाजाच्या उदयमुख समाजसेविका व नुकत्याच पार पडलेल्या कन्नड न.परिषदेत राष्ट्रवादी पक्षाकडून नगरसेविका पदासाठी उभ्या राहिलेल्या सौ.रंजनाताई रवींद्र राठोड यांची मतदारांनी भरघोस मतांधिक्याने नगरसेविका पदी निवडून दिल्याने व त्यांचे पक्षासाठीचे योगदान बगता त्यांची पक्षाचे वतीने एकमुखी कन्नडच्या न.परिषदेवर नगराध्यक्षापदी निवड करण्यात आली आहे.
आज दि.13 रोजी शहरातील पिशोरनाका परिसरात राष्ट्रवादी ( अजित पवार ) गट पक्षाचे तालुक्याचे सर्वेसर्वा स्वीकृत नगरसेवक पदी वर्णी लागलेले न.परिषदेचे मा.गटनेते व आता पक्षाचे वतीने स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागलेले श्री.संतोष कोल्हे,मा.नगराध्यक्षा सौ.स्वातीताई कोल्हे,तसेच पार पडलेल्या निवडणुकीत घवघवीत मतदान घेऊन नगरसेवक पदी निवड झालेल्या नगरसेवक व पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तसेच ढोल ताशांच्या व फटाक्याच्या अतिबाजीत निवड करण्यात आली आहे.या निवडीचे शहरात सर्वत्र मोठे कौतुक होत.