काम, क्रोध, मत्सर, लोभ यांच्यावर मात करण्यासाठी नामसाधना गरजेची – समाधान महाराज
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी / मनुष्प जीवनाच्या विकासातील मार्गावरील प्रमुख अडसर असलेल्या काम, क्रोध, मत्सर, लोभ यांच्यावर मात करण्यासाठी नामसाधना गरजेची असल्याचे प्रतिपादन कथाकार समाधान महाराज शर्मा यांनी गंगापूर येथील शिवमहापुराण कथेचे पाचवे पुष्प गुंफताना व्यक्त केले.पाचव्या दिवसाची शिवमहापुराण कथा सुरू होण्यापूर्वी गंगापूर शहरात जोरदार पावसाची सुरूवात होउनही भाविकांनी हजारोच्या संख्येत भिजत येउन् कथेला हजेरी लावली. यावेळी जिजाउ फाउंडेशनच्या अध्यक्ष सुवर्णा जाधव, आयोजक संजय जाधव, रामेश्वर मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती होती. समाधान महाराज पुढे म्हणाले की, लहान मुले ही तुमच्या व देशाचे उद्याचे भविष्य आहे त्यामुळे त्यांना चांगले संस्कार द्या, मोबाईलला पासवर्ड देऊ नका जे पासवर्ड ठेवतात त्यांच्या मनात पाप असते. महाराज पुढे म्हणाले की, विपरित परिस्थितीचा अनुभव आल्याशिवाय प्रगतीचा मार्ग सापडत नाही, जीवनात वनवास आला तरच जीवनात सुवास येतो, आपले राहणीमान साधे ठेवा, श्रीमंतीचे प्रदर्शन करणे चुकीचे आहे. यावेळी लक्ष्मण कदम, दिपक कदम, गोपाळसेठ राउत यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष अंबिलवादे, कृष्णा पाटील, रामेश्वर नावंदर, सुरेश नेमाडे,योगेश पाटील मुकुंद जोशी, सोपान देशमुख,विशाल दारूंटे, अनिल जाधव,गोपाळ राऊत, बाबासाहेब लगड, यांच्यासह हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती