Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादकल्पनाशक्ती ही नवनिर्मितीपेक्षा अधिक महत्त्वाची असते पद्मभूषण डॉ. विजय भटकर

कल्पनाशक्ती ही नवनिर्मितीपेक्षा अधिक महत्त्वाची असते पद्मभूषण डॉ. विजय भटकर

कल्पनाशक्ती ही नवनिर्मितीपेक्षा अधिक महत्त्वाची असते पद्मभूषण डॉ. विजय भटकर

एमजीएममध्ये नावीन्यपूर्ण ‘मेत्ता  २०२५’ उपक्रमाचा शुभारंभ

‘एम्पॉवरिंग आयडीयाज, ट्रान्सफॉर्मिंग फ्युचर्स’ विषयावर मान्यवरांनी मांडले आपले विचार

छत्रपती संभाजीनगर : आजच्या मेत्ता परिषदेत कल्पनाशक्तीचं खूप मोठं दर्शन विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आलं आहे. काही गोष्टी अशा आहेत ज्या ना विद्यार्थ्यांनी कल्पना केल्या आहेत, ना शिक्षकांनी! हाच नवसर्जनाचा खरा मार्ग आहे आणि हीच गोष्ट विद्यार्थ्यांना शिकवणं आवश्यक असून कल्पनाशक्ती ही नवनिर्मितीपेक्षा अधिक महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन जागतिक ख्यातीचे संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण प्रा.डॉ. विजय भटकर यांनी यावेळी केले.

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने ‘एम्पॉवरिंग आयडीयाज, ट्रान्सफॉर्मिंग फ्युचर्स’  या संकल्पनेवर आधारित ‘मेत्ता  २०२५’ (METTA 2025 – Minds Empowered Through Transformative Technology and Academic synergy) या विशेष संवाद सत्राच्या प्रथम आवृत्तीचा शुभारंभ आज रूक्मिणी सभागृह येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी जागतिक ख्यातीचे संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण प्रा.डॉ. विजय भटकर,  एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचे  कुलगुरू प्रा.डॉ. रजनीश कामत, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे संचालक प्रा. डॉ.सुनील भागवत, ग्राइंड मास्टर मशिन्सच्या संचालिका मोहिनी केळकर, एन्ड्रेस अँड हाऊसर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कैलास देसाई,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रा. डॉ.के.व्ही.काळे,गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.प्रशांत बोकारे, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, सर्व अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.

पुढे बोलताना पद्मभूषण डॉ.विजय भटकर म्हणाले, एमजीएम विद्यापीठ एक उदयन्मुख विद्यापीठ असून येथे येऊन मला येऊन आनंद झाला. मी फार आश्चर्यचकित झालो आहे की, एक नवं उदयोन्मुख विद्यापीठ म्हणून एमजीएम विद्यापीठामध्ये नवविज्ञान आणि नवकल्पकतेच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना समृद्ध केलं जातंय. मला खूप समाधान वाटतंय की, आपल्या तरुण विद्यार्थ्यांना नव्या विचारसरणीची आणि नवकल्पनांची ओळख येथे करून दिली जात आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ऋषिकेश काकडे आणि प्रा.माधुरी कावरखे यांनी केले तर आभार प्रदर्शन कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर यांनी केले.

१.      फोटो ओळ : डावीकडून जागतिक ख्यातीचे संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण प्रा.डॉ. विजय, भटकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रा. डॉ. के. व्ही. काळे, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे संचालक प्रा. डॉ.सुनील भागवत, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचे  कुलगुरू प्रा.डॉ. रजनीश कामत, ग्राइंड मास्टर मशिन्सच्या संचालिका मोहिनी केळकर, , एन्ड्रेस अँड हाऊसर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कैलास देसाई, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रशांत बोकारे, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर व सर्व संबंधित उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments