तीन दिवसीय कल्याण मंदिर विधानाची हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्ती भावाने सांगता
जैनेश्श्वरी दिक्षार्थी ब्र.रूषिदिदी यांचा अभिनंदन सोहळा उत्साहात संपन्न
छ.संभाजीनगर/प्रतिनिधी/ श्री.१००८ पुष्पदंत दिगंबर जैन मंदिर चिंतामणी रेसिडेन्सी बीड बाय पास येथे आचार्य डॉ.प्रणामसागरजी महाराज यांच्या आर्शिवादाने व उपाध्याय विरंजनसागरजी महाराज विनिशोधसागरजी महाराज, विसौम्यसागरजी महाराज, क्षुल्लिका विशिलाश्री माताजी यांच्या उपस्थितीत तीन दिवसीय महोत्सवाची मोठया भक्ती भावाने सांगता करण्यात आली. सर्व प्रथम सकाळी भगवंताचा पंचामृत अभिषेक व शांतीधारा संपन्न झाली. संपुर्ण कार्यकम हा अनुष्ठाचार्य कपिलभैया यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी प्रतिमाधारी व उपवास धारकांचा सन्मान समारोह संपन्न झाला. यावेळी 105 प्रतिमा धारीचा व सोलहकारन उपवासधारक व दशलक्षन उपवास कर्ता याचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिला मंडळाच्या वतीने मंगलाचरण करâन कार्यकमाची सुरâवात करण्यात आली. तर दिप प्रज्वलन युवा मंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी आचार्य विरागसागरजी महाराज यांची महिला मंडळाच्या वतीने पुजा करण्यात आली. यावेळी उपाध्याय विरंजन महाराज यांनी सांगीतले की, मनुष्याने जीवनामध्ये संयम ठेवल्याने त्याचे जीवन अतिशय महान बनत असते. ज्या प्रमाणे गाडीला बे्रक महत्वाचा असतो त्याच प्रमाणे संयम रुपी बे्रक हे जीवन महान बनत असतात. तसेच पुढे म्हणाले की, मनातुन वासनेचा विकार निघुन जाणे म्हणजे निर्वाण आहे आणि मोहापासुन दुर राहणे म्हणजे मोक्ष आहे. मोक्ष हि वडीलोपार्जीत संपत्ती नसुन आपल्या कर्माने व श्रमाने मिळवावी लागते महावीरांच्या संस्कृतीला श्रमण संस्कृती म्हणुन ओळखले जाते. श्रमण संस्कृतीचा अर्थ असा आहे की, मिळवाल ते श्रमाने मिळेल तुम्ही जेथे तुम्ही पोहचाल तेथे तुम्ही श्रमाने पोहचाल, मोक्ष हे प्रसादात नाही तर प्रयास केल्याने मिळत असते भगवान महावीर हे प्रार्थनेने नाही तर प्रयत्नाने मिळतील. परमेश्श्वर हा पुजा केल्याने मिळत नसुन पुरâषार्थ केल्याने मिळतो. फक्त प्रार्थना हि अधुरी असुन प्रार्थने बरोबर प्रयत्नही आवश्यक आहे असे ही यावेळी सांगीतले.
तसेच यावेळी बा.ब्र.रूषिदीदी यांचा अभिनंदन समारोह व गोदभराई समारोह उत्साहात संपन्न झाला. यावेळी सर्व अध्यक्ष व समाज बांधवाच्या वतीने जैनेश्श्वरी दिक्षार्थी रूषिदिदी यांचा अभिनंदन करण्यात आला. यावेळी उपस्थित भाविकांना विजयादेवी रावका, विदया रावका, अभय रावका यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. यावेळी देशमुखनगर, राजाबजार, अरिहंतनगर, बालाजीनगर, चिंतामणी कॉलनी, शिवाजीनगर, हडको, सिडको, रामनगर आदी ठिकाणाहुन हजारो भक्त उपस्थित होते.
कार्यकम यशस्वी करण्यासाठी श्री.१००८ पुष्पदंत दिगंबर जैन मंदिर चिंमामणी रेसीडेन्सी बीड बाय पास परिवाराने विशेष परिश्रम घेतले.