बंदीजना करीता मध्यवर्ती कारागृहत
‘जीवन जगण्याची कला’ शिबिर संपन्न
छत्रपती संभाजीनगर – मध्यवर्ती कारागृह येथे बंदीस्त बंदी यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम रहावे आणि कारागृहतून मुक्त झाल्यावर त्यांनी समाजाचा मुख्य प्रवाहात येऊन एक सुजान नागरिक म्हणून समाजाचा एक भाग बनावे, या उदात्त उद्देशाने अपर पोलीस महासंचालक, कारागृह सुधारसेवा पुणे सुहासे वारके, विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपनिरीक्षक मध्ये विभाग वैभव आगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृहातील पुरुष व महिला बंदयारीता सात दिवसीय आर्ट ऑफ लिव्हिंग (जीवन जगण्याची कला) शिबिराचे आयोजन दि.17 ते 23 जुलै या कालावधीत करण्यात आले आहे.
शिबिराचा उद्घाटन समारंभ मध्यवर्ती कारगृह अधीक्षक एस.आर. साळवे यांच्या हस्ते दि.17 जुलै रोजी करण्यात आला. या वेळी उपअधिक्षक संदीप भुतेकर, वरीष्ठ तुरुंगाधिकारी प्रदीप रणदिवे तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिराचे प्रशिक्षक रत्नाकर गोरे आणि के.एल. बलांडे कारागृहातील बंदीजन उपस्थित होते.
