राजपाल काकडे यांची भारतीय जनता पक्षाच्या “युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष” पदी निवड
केज :- तालुक्यात युवकांची मोठी फळी निर्माण करणारे युवा नेते राजपाल भैया काकडे यांची भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार पंकजाताई मुंडे ,मा.खासदार प्रितमताई मुंडे, केज मतदार संघाच्या आमदार नमिताताई अक्षय मुंदडा , राज्य परिषद सदस्य अक्षयजी मुंदडा, जेष्ठ सामाजिक नेते नंदकिशोरजी (काकाजी) मुंदडा,तालुकाध्यक्ष भगवान केदार यांच्या आदेशाने युवा नेते राजपाल भैया काकडे यांची भाजपच्या युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल राजकीय,सामाजिक तसेच मित्र परिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे.