शहरातील लक्कडकोट भागात कादरीया मस्जिद ते नूरानी मस्जिद पर्यंतचे अतिक्रमणा काढण्याची मागणी
नाल्यांवरील आतिक्रमणामुळे वारंवार वादविवाद व भाःडणे होत आहेत.
जालना /प्रतिनीधी / शहरातील नुरानी नगर लक्कडकोट भागात कादरीया मस्जिद ते नुरानी मस्जिद जवळ जाणारा रस्त्यात अतीक्रमण
केल्या बद्दल आज दि.19 सोमवार रोजी चार वा. च्या सुमारास लेखी निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, सदर तीन मिटर च्या रस्त्यावर लोकांनी बेकायदेशीर अतिक्रमण करुन
बेकायदेशीर बांधकाम व नालीवर संडास बाथरूम चे बांधकाम केलेले आहे.व घरा समोर रास्त्यालगत टपऱ्या, शेड व घर उपयोगी वस्तू ठेवलेल्या
आहे. ज्या मुळे लोकांना येण्या-जाण्यासाठी त्रास होत असून आपसात दररोज या करणा वरून वाद विवाद आणि भांडण होत आहे.
सदरील अतिक्रमण हटविण्यात यावे व झालेले अतिक्रमण संपूर्ण रस्ता मोकळा करण्यात यावा तसेच आत मध्ये झेंड्या जवळ खूप अतिक्रमण झालेले आहे.पत्र्याच्या शेडचे घर नाली वर बांधलेले आहे. किराणा दुकान नाली वर बांधलेले
आहे. या अतिक्रमण मुळे कचऱ्याची घंटा गाडी आत येत नाही त्यामुळे परिसरातील नागरीक काचरा नाल्यांमध्ये फेकतात.
या सर्व बाबीवर मानपाने लक्ष देऊन त्वरित अतिक्रमणे हटवावी
इम्रान शेख ,इरफान खान,फारूक शेख ,सलमान शेख ,साहिल शेख, रफिक खान,सिकंदर खान ,सलीम शेख,अंजुम खान ,रफिक शेख ई. च्या वतीने करण्यात आली आहे.