दैनिक आत्ताच एक्सप्रेसच्या पाठपुराव्याला यश
कडेठाण चौफुली ते गेवराई मर्दा रस्त्याच्या कामाचे उदघाट्न
प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत कडेठाण चौफुली,गेवराई मर्दा ते कडेठाण मार्गे बक्षीसवाडी आता सिमेंट रस्ता होणार.
आत्ताच एक्सप्रेस
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी/
एखाद्या गावातील नागरिकांना किती मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असेल,हे अनुभवायचे असेल तर त्यासाठी पारुंडी चौफुली,गेवराई मर्दा मार्गे कडेठाण तिन ते चार किलोमीटर रस्त्याची सफर करावी. रस्त्याची दुर्दशा इतकी की, रस्त्यावर खड्डे की खड्यात रस्ता असा प्रश्न प्रवाश्यांना पडल्याशिवाय राहणार नाही.पारुंडी चौफुली, गेवराई मर्दा, मार्गे कडेठाण गावातील नागरिकांचा वावर असणारा चार किलोमीटरचा हा रस्ता, भारत स्वातंत्र्य झाल्यापासून एक वेळा झाला आहे. त्या नंतर कधीच दुरुस्त झाला नव्हता.तर कधी रस्त्यावर खडी किंवा खडीवर मुरूम पण नव्हता .
==============
पैठण विधानसभा मतदार संघाचे आमदार विलासबापू भुमरे यांच्या प्रयत्नातून व शिंदेगटाचे सरपंच विक्रम जायभाये यांच्या सततच्या पाठपुराव्याने गेली अनेक वर्ष रखडलेल्या गेवराई मर्दा रस्त्याच्या कामाला सुरवात झाली आहे.गेली काही वर्ष या रस्त्याचे काम रखडल्यामुळे अबाल वृद्ध महिला, विद्यार्थी यांना याच मार्गातून प्रवास करावा लागत होता, तसेच वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. अखेर या रस्त्याच्या कामाला सुरवात झाल्यामुळे गेवराई मर्दा, कडेठाण येथिल नागरिकांना दिलासा मिळाला असून, लवकरच हा रस्ता तयार होऊन या रस्त्याचा लोकार्पण सोहळा खासदार संदीपान भुमरे व आमदार विलासबापू भुमरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.