कबीर पंथीय भक्तांचा महाशिवरात्रीत जागर
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील-वेरूळ येथे सालाबादा प्रमाणे महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर रविवारी (दि. १५) रात्री कबीर पंथाचे कीर्तन,भजन आणि सत्संग कार्यक्रमाचे आयोजन वेरूळ यथील महंत पोपटदास महाराज यांच्या वतीने करण्यात आले होते.
वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिराजवळील जागेवर ही भोजनाची मैफल रात्रभर चालते,यात सामील भक्त एकाहून एक सरस अशी भजन सादर करून रात्रीचा जागर भक्तीमय करतात.
कबीर महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनासह,वारकरी संप्रदाय,यात मोठ्या संख्येने सहभागी होतो.
वेरुळ येथील महाशिवरात्रीचे इतर समाजासाठी देखील आगळे वेगळे महत्व आहे. या गांवात असलेल्या वीरशैव लिंगायत, वीरशैव कक्कय्या,धोबी परीट समाज,चर्मकार समाजाचे मठ असून,या मठांमध्ये महाशिवरात्री पूर्वी सप्ताहाभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते,याची सांगता महाशिवरात्रीच्या दुसरया दिवशी महाप्रसादाचे होते.
या महाशिवरात्री निमित्त या सर्व समाजाचे भाविक भक्त राज्यभरातून येतात,एक प्रकारे भक्तिमय स्नेहमिलन करून परतीच्या प्रवासाला लागतात.
महाशिवरात्रीनिमित्त या मठांमध्ये कीर्तन, भजनाचे आयोजन केले जाते.या कार्यक्रमांमध्ये भक्ती आणि आध्यात्मिक प्रबोधनाचा संगम पाहायला मिळतौ.
कबीर महाराज कीर्तन सोहळा,महाशिवरात्री निमित्त कबीर महाराजांचे कीर्तन,भजनाचे कार्यक्रम वेरूळ या ठिकाणी दरवर्षी आयोजित करण्यात येते अशी माहिती वेरूळ येथील महंत पोपटदास महाराज यांनी दिली.
