निरखेडा येथील माजी ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपा मध्ये जाहीर प्रवेश
लोकनेते श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, तसेच भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष श्री. भास्कर आबा दानवे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली, निरखेडा ता.जालना येथील माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. अशोक पाडमुख, श्री. दादाभाऊ जाधव, श्री. गंगाधर जाधव, श्री. विष्णुपंत गायकवाड व श्री. अशोक मोहिते यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
या पक्षप्रवेश प्रसंगी भाजपा ग्रामीण तालुकाध्यक्ष श्री. संजय डोंगरे, श्री. शिवाजी दादा शेजूळ, श्री. वसंत शिंदे, , श्री. सुनील पवार, श्री. गणेश खरात, श्री. राजाराम (राजे) जाधव, श्री. गोवर्धन कोल्हे, नितीन कायंदे, अकबर परसुरवाले तसेच इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपा पक्षाची वाढती लोकप्रियता आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीमुळे अनेक कार्यकर्ते पक्षात सहभागी होत आहेत.
