Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादजिल्हा प्रशासनाकडून नागरिकांसाठी तीन अभिनव माहिती तंत्रज्ञान उपक्रमाची सुरुवात

जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांसाठी तीन अभिनव माहिती तंत्रज्ञान उपक्रमाची सुरुवात

जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांसाठी तीन

अभिनव माहिती तंत्रज्ञान उपक्रमाची सुरुवात

 

  • जिल्हाधिकाऱ्यांची भेट आता एका क्लिकवर

जालना :- जालना जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि सक्षम तांत्रिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तीन महत्त्वपूर्ण माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांचा शुभारंभ केला आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शनाखाली हे उपक्रम विकसित करण्यात आले असून जिल्ह्याच्या डिजिटल युग प्रारंभ परिवर्तनातील हा महत्वाचा टप्पा मानला जात आहे.  या उपक्रमांमुळे शासकीय कार्यालयातील कामे आता घरबसल्या तसेच अगदी कमी वेळात पूर्ण करता येतील. तरी नागरिकांनी या डिजिटल सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा आणि प्रशासनाच्या या डिजीटल प्रवासात सहभागी व्हावे, असे  आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 “मिट युवर कलेक्टर” या वेब-आधारित अ‍ॅप्लिकेशनद्वारे नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी ऑनलाईन स्लॉट बुक करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे भेट प्रक्रियेचे पूर्वनियोजन, वेळेची स्पष्टता आणि तक्रार निवारणातील कार्यक्षमता वाढणार आहे. कृषी क्षेत्रासाठी सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्सअप चॅटबोट “ऍग्रीपथ” (9172814066) च्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेत रस्ता अतिक्रमणमुक्ती, नवीन शेतरस्ता प्रस्तावासाठी अर्ज तयार करणे, सरकारी सेवांची माहिती मिळवणे तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी त्वरित संपर्क साधणे अशा सुविधा उपलब्ध होणार आहेत. “जालना मित्र” या सेवा चॅटबोटद्वारे (7387938774) नागरिकांना महा ई-सेवा केंद्रांच्या घरपोच सेवांसाठी अपॉइंटमेंट घेता येणार आहे. “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत सुरू केलेल्या या सेवेने नागरिकांना कार्यालयीन फेऱ्या कमी होवून सेवा थेट घरपोच मिळण्यास मदत होणार आहे. या तीनही उपक्रमांची अंमलबजावणी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी उन्मेष सपकाळ आणि जिल्हा आयटी टीम यांच्या संयुक्त प्रयत्नांतून करण्यात आली आहे.  हे तीन उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेत अधिकाधिक वृध्दी करतील आणि नागरिकांना संवाद साधणे अधिक सोपे होईल. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी या माहिती तंत्रज्ञान आधारित सुविधा विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होईल आणि शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ पध्दतीने मिळण्यास मदत होईल.

Previous article
Next article
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक, व्यक्तिगत वृद्धी साठी शिक्षकाची भूमिका संवर्धकांची. डॉ पंकजा वाघमारे छत्रपती संभाजीनगर दिनांक 27 नोव्हेंबर 2025 म. शि प्र मंडळ संचालित देवगिरी महाविद्यालय आणि मराठवाडा इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि छ. संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने इफेक्टिव्ह मेंटोरिंग या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यशाळेचे उदघाटन प्रोफेसर डॉ. गुलाब खेडकर यांच्या हस्ते संप्पन झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ पंकजा वाघमारे, उच्च शिक्षण सह संचालक, छ. संभाजीनगर यांची उपस्थिती होती तर कार्यक्रम अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर होते.. राज्यस्तरीय कार्यशाळा आरंभी कार्यशाळेचे समन्वयक उपप्राचार्य डॉ गणेश मोहिते यांनी प्राध्यापक विकास कार्यक्रम आणि कार्यशाळा विषय इफेक्टिव्ह मेंटोरिंग या संबंधी प्रास्ताविक पर भूमिका विशद केली. आपल्या उदघाटनपर बीज भाषणात डॉ गुलाब खेडकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा आत्मा विदयार्थी संवर्धन आहे. शिक्षकांची भूमिका केवळ अभ्यासक्रमापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांची शैक्षणिक वृद्धी, व्यावसायिक वृद्धी आणि विकास तसेच व्यक्तिगतवृद्धी मध्ये शिक्षकांची भूमिका अनन्यसाधारण आहे. या मार्गदर्शक भूमिकेतून विद्यार्थ्यांचे सर्वांगीण मूल्यमापन होणार आहे. या प्रभावी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच शैक्षणिक, व्यक्तिगत, व्यावसायिक कामगिरीमध्ये आमुलाग्र बदल होण्यासाठी इफेक्टिव्ह मेंटोरिंग ही आजच्या शिक्षण व्यवस्थेची गरज आहे असे प्रतिपादन केले. या उदघाटन समारंभाच्या प्रमुख पाहुणे डॉ पंकजा वाघमारे यांनी उच्च शिक्षण सह संचालक हे मेंटर च्या भूमिकेत आहेत आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 प्रभावी पणे राबवण्यासाठी प्रभावी मार्गदर्शन, तसेच शिक्षकांनी विदयार्थ्यांची जबाबदारी आयुष्यभरासाठी घेतली पाहिजे. यामधून शैक्षणिक,व्यावसायिक,सहाचर्य निर्माण होऊन शिक्षक, विद्यार्थी आणि समाज यातील अंतर कमी होण्यासाठी मदत होईल असे विचार मांडले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांनी मेंटोरिंग च्या माध्यमातून शिक्षकांनी विदयार्थ्यांना मूल्य शिक्षण दिले पाहिजे, जीवन कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली पाहिजेत. आजच्या काळात कुटुंबातील सदस्य यांच्यापेक्षा ही शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे म्हणून मेंटर मेंटी या विदयार्थी केंद्री उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे असे विचार मांडले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments