Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादजिल्हा प्रशासनाकडून अपघातग्रस्त ठिकाणी तातडीने मदत कार्य

जिल्हा प्रशासनाकडून अपघातग्रस्त ठिकाणी तातडीने मदत कार्य

जिल्हा प्रशासनाकडून अपघातग्रस्त ठिकाणी तातडीने मदत कार्य

 

जालना :- जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी ते राजुर रस्त्यावर शुक्रवार दि.29 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे अंदाजे 5 वाजता चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरीत जावून पडली होती. जालना जिल्ह्यातील अपघाताची माहिती समजताच या घटनेचे गांभिर्य ओळखून जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत अपघातग्रस्त ठिकाणी तातडीने अचुक व समन्वय ठेवून बचाव व मदत कार्य करण्यात आले.

सकाळपासून उपविभागीय अधिकारी तथा  सहायक जिल्हाधिकारी डॉ.बी. सर्वांनन, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी नितिन कटेकर, प्र.तहसीलदार सुरेश मिसाळ, अग्निशमन अधिकारी माधव पाणपट्टे हे घटनास्थळावर प्रत्यक्ष हजर झाले होते. जिल्हा प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न करत क्रेनच्या सहाय्याने दुर्घटनाग्रस्त कार विहीरीतुन बाहेर काढण्यात आली. तसेच या अपघातात मृत्यु पावलेल्या व्यक्तीमध्ये 3 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश असून एकुण 5 मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. विहीरीतील मृतदेह शोधण्यासाठी गोताखोर यांनी तळाशी जावून शोध घेतला. पोलिस विभागाकडून अधिक तपास करण्यात येत आहे. अशी माहिती मिळाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments