आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/प्रतिनिधी/ जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथे शनिवारी ( दि ७) “जागतिक महिला दिन” निमित्त कतृत्वान महीलाचा सन्मान करण्यात आला.यवेळी मान्यवराच्या शुभहस्ते राजमाता जिजाऊ,माता रमाई आंबेडकर,पुण्यश्लोक अहील्याबाई होळकर,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्योलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी नवनिर्वाचित जि.प.सदस्या पुष्पा काळे,सोयगाव नगराध्यक्षा आशाबी तडवी, नवनिर्वाचित प.स.सदस्या सविता गव्हाडे, नगरसेविका कुसूम दुतोंडे,माजी विद्यार्थीनी निशा मधूकर पगारे,तहसील कार्यालयातील वरीष्ठ लिपीक उज्वला वामने तसेच पंचायतसमिती सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक दौड तसेच गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली तसेच सोयगाव केंद्र प्रमुख फिरोज तडवी यांच्या सह पदाधिकारी व महिला माता पालक यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. शाळेतील कर्तृत्ववान माजी विद्यार्थीनी शाळेतील विद्यार्थ्याना online पध्दतीने अनमोल असे मार्गदर्शन केले यात डॉ.दिपाली निकुंभ अबाजोगाई,डॉ.सोनाली निकुंभ चिकलठाणा,चारुशिला पाटील स्विय सहाय्यक मंत्रालय मुबंई,प्राजक्ता रोकडे, डॉ.ज्योती पंडीत वैद्यकियअधिकारी,प्रीती दामधर करनिरक्षक न.पा.तसेच सर्व मान्यवरांनी शाळेच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त करून शाळा डिजिटल झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला .यावेळी समाजसेवक राजू दुतोंडे,समाजसेवक सुनिल गावंडे,समाजसेवक विजय काळे,समाजसेवक ,मयुर मनगटे,प्रशांत जाधव यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरीक,पालक उपस्थित होते.नवनिर्वाचित जिल्हा परीषद सदस्या पुष्पा काळे व माजी विद्यार्थीनी निशा पगारे यांनी विद्यार्थ्याना व माता पालकांना मार्गदर्शन केले यावेळी वर्ग पहीली मध्ये नविनप्रवेश घेतलेल्या सतरा विद्यार्थ्याचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक किरणकुमार पाटील,सुरेखा चौधरी,पंकज रगडे,मंगला बोरसे,रामचंद्र महाकाळ,सविता पाटील,गणेश बाविस्कर,प्रतिभा कोळी,अकुश काळे,विवेक महाजन,अनिल देसाई,तान्हाजी चव्हाण,शुभम देसले,पुनम लाड यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रतिभा कोळी यांनी तर आभार प्रदर्शन सविता पाटील यांनी केले.