Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादजिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथे राष्ट्रमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी...

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथे राष्ट्रमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती उत्सव साजरी   

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथे राष्ट्रमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती उत्सव साजरी   

आत्ताच एक्सप्रेस

सोयगाव/प्रतिनिधी/ जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब तसेच युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने सोयगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री यमुलवाड साहेब व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष रवींद्र काळे शालेय स्थापन समितीचे अध्यक्ष भागवत गायकवाड  यांच्या शुभ असते राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी माजी विद्यार्थी संघ मंगेश सोहनी समाजसेवक सुनील गावंडे ज्येष्ठ पत्रकार भरत पगारे पत्रकार पुनम परदेशी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य अण्णा वाघ,रविंद्र साखळे आदिंची  प्रमुख उपस्थिती होती.यावेळी विद्यार्थ्यानी युगपुरूष स्वामी विवेकानंद यांची तर विद्यार्थीनीनी राजमाता जिजाऊची वेषभूषा परीधान केल्या होत्या यावेळी विद्यार्थ्यासाठी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच सोयगाव गटविकास अधिकारी यम्मुलवाड यांच्या व मान्यवराच्या शुभहस्ते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी याच्या संकल़्पनेवर आधारीत दशसूत्री कार्यक्रमावर जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथिल उपक्रमावर आधारित चित्रफीत व्हिडिओ निर्मिती चे उद्घाटन करण्यात आले यावेळी गटविकास अधिकारी यम्मुलवाड यांनी सोयगाव शाळा एक जिल्हा परीषदेची शाळा असून सुध्दा खाजगी शाळेला लाजवेल अशी असल्याचे नमुद केले तसेच अध्यक्ष माजी विद्यार्थी संघ रवींद्र काळे यांनी शाळेच्या कार्याबद्दल व जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी प्रेरणादायी भाषण केले यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक किरण कुमार पाटील पदवीधर शिक्षिका सुरेखा चौधरी पंकज रगडे शिक्षिका मंगला बोरसे प्रतिभा कोळी सविता पाटील गणेश बाविस्कर अंकुश काळे पांडुरंग बारगजे मंदा मस्के तानाजी चव्हाण शुभम देसले यांनी परीश्रम घेतले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments