जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन
जालना :- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि.3 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला समितीवर नियुक्त शासकीय सदस्य, अशासकीय सदस्यांनी वेळेवर उपस्थित रहावे. तसेच सर्वसामान्य नागरिकांचे ग्राहक हितसंबंधित तक्रार असल्यास सदर बैठकीच्या दिवशी उपस्थित राहून आपला लेखी स्वरुपाचा अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी तथा जालना संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव सविता चौधर यांनी केले आहे.
