जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन
जालना/प्रतिनिधी/ मराठा सेवा संघ प्रेरणित राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव समिती २०२६ यांच्या वतीने जालना जिल्ह्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत दिनांक १० जानेवारी रोजी मराठा सेवा संघ कार्यालयात रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे. तसेच जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा विषय
संस्कार, शौर्य आणि स्वराज्य – जिजाऊंची त्रिसूत्री असा असून, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांचा प्रसार व्हावा, हा या स्पर्धेचा उद्देश आहे. या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना जन्मोत्सव समितीच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतून सहभागी विद्यार्थ्यांची निवड करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या स्पर्धकांची यादी दिनांक १० जानेवारीपर्यंत समितीकडे सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
रांगोळी व वक्तृत्व स्पर्धेत प्रावीण्य मिळविणाऱ्या गुणवंतांचा सत्कार सोहळा दिनांक ११ जानेवारी, रविवार रोजी सायंकाळी ५ वाजता मातोश्री लॉन्स, अंबड रोड, जालना येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता प्रा. एकनाथ शिंदे यांचे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास जिजाऊ भक्तांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन
समितीचे अध्यक्ष बबनराव गाडेकर (९६९९०५७३७७), कार्याध्यक्ष सोमीनाथ हराळ (९०४९८१०००७) व सचिव दिनेश भुतेकर (९९७५६३८५५५)
यांनी केले आहे. रांगोळी स्पर्धेचे नियोजन शिवमती मंजुश्रीताई झोडगे (९१५६९७०६०८) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
