Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादजवखेडा बु येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात

जवखेडा बु येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात

जवखेडा बु येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात

कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील जवखेडा बु.येथील प्राचीन राशेश्वर महादेव मंदिर येथे दि.९ ते १६ डिसेंबर रोजी अखंड हरीनाम सप्ताह व शिवमहापुरान कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
धार्मिक, उत्साह, भक्तिभाव व गावातील एकत्रित पुढाकार यामुळे या आठवडाभर चालणाऱ्या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या शिवमहापुरान सप्ताहाचा पंच क्रोशितील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन जवखेडा बु. येथील हरिभक्त मिञ मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.
आठवडाभर चालणारा शिवमहापुरान कथेनिमित्त दैनंदिन कार्यक्रमांतर्गत सकाळी ४ते ६:३० काकडा, ९ ते १२ शिवमहापुरान कथा, दुपारी १२ ते ३ विश्रांती, ३ ते ५ शिवमहापुरान कथा, सायंकाळी ५ ते ६ हरीपाठ, राञी ७ ते ९ हरीकिर्तन, ९ ते १० भोजन पंगत,नंतर जागर होईल.
या कार्यक्रमात शिवमहापुरान कथा प्रवक्ते ह.भ.प.महादेव महाराज निपाणीकर हे कथा वाचन करणार आहेत.
दि ९ मंगळवार रोजी सायंकाळी ७ ते ९  ह.भ.प.पांडुरंग काका पळसकर, दि.१० बुधवार ह.भ.प मुरारीजी महाराज आनंदे , दि.११ गुरूवार रोजी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज राऊत , दि.१२ शुक्रवार रोजी ह.भ.प.सुनिल महाराज बेटावत, दि.१३ शनिवार रोजी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज शेलुद, दि.१४ रविवार रोजी ह.भ.प.शिवा महाराज वारस्कर , दि.१५ सोमवार रोजी ह.भ.प.राधेशाम महाराज चातुर्मास्य, दि. १६ मंगळवार रोजी सकाळी ११ ते १ ह.भ.प.महादेव महाराज निपाणीकर यांचे काल्याचे किर्तन होईल या शिवमहापुरान सप्ताहाचा पंच क्रोशितील भाविकांनी श्रवणाचा लाभ घेण्याचे आवाहन जवखेडा बु.सारोळा वाडी येथील ग्रामस्थांनी केले आहे.दरवर्षी या सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments