जवखेडा बु येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील तालुक्यातील जवखेडा बु. येथे आयोजित भंडाऱ्याच्या कीर्तना प्रसंगी ते बोलत होते. महाराज म्हणाले की, अहंकारी माणसाला स्तुती, तर लोभी माणसाला पैसा प्रिय असतो. परंतु “मुद्द्याच्या गोष्टी लपवून ठेवून भलत्याच कर्मकांडात गुंतवून ठेवणारे कधीच संत होऊ शकत नाहीत. विचाराने नव्हे तर आचाराने संतोषाचा आदर्श घ्यावा,” असेही त्यांनी स्पष्ट केले.धनसंपत्ती कितीही कमवली तरी संत संगती शिवाय जीवनात समाधान मिळत नाही. आपल्यात मीपणाचा अहंकार वाढला आहे; आपणच समर्थ आहोत, असे आपण समजू लागलो आहोत. पण या जगात संता शिवाय कोणीही समर्थ नाही,” असे महत्त्वाचे प्रतिपादन त्यांनी केले.
संत साहित्य मानवासाठी प्रेरणादायी असून धर्मग्रंथांनी आत्मकल्याणाचा मार्ग दाखविल्याचे ते म्हणाले. “रामायण कथा म्हणजे दुःख समूळ नष्ट करणारे अमृत आहे. या मार्गावर चालून जीवन सत्कर्मी लावावे,” असेही महाराजांनी भाविकांना मार्गदर्शन केले.