Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादजरंडीमध्ये लोकसहभागातून नदीच्या पात्राचे खोलीकरण !

जरंडीमध्ये लोकसहभागातून नदीच्या पात्राचे खोलीकरण !

जरंडीमध्ये लोकसहभागातून नदीच्या पात्राचे खोलीकरण !
आत्ताच एक्सप्रेस 
सोयगाव/प्रतिनिधी/ सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे लोकसहभागातून दहा वनराई बंधारेसह खडकी नदीच्या पात्राचे खोलीकरण शनिवारी (दि.०६)करण्यात आले.नदीच्या पात्राच्या खोलीकरण व वनराई बंधाऱ्यांमुळे वन्यप्राण्यांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. नदीच्या खोलीकरण करण्याकामी सरपंच स्वाती पाटील,उपसरपंच संजय पाटील,ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे, मधुकर पाटील,मधुकर सोनवने सहभागी झाले होते.यावर्षी भरपूर पाऊस पडला असला तरी पाऊस उघडल्यानंतर पाण्याचे स्त्रोत असलेले ओढे, ओहोळ, झरे आटू लागले असून, भविष्यातील पाणीटंचाई ओळखून पाण्याची बचत व शेतीलापाण्याची बचत व वन्यप्राण्यांना फायदा होण्याच्या दृष्टीने जरंडी गावातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून नदीच्या पात्राचे खोलीकरण व वन राई बंधारे, उभारले यावेळी ग्रामपंचायत सदस्य , स्वयंसेवक,महिलांनी सर्वांनी मिळून जरंडी येथे वनराई बंधारे व नदीचे खोलीकरण करून वाहून जाणारे पाण्याची साठवण केले आहे.
—ग्रामपंचायतीचे विविध उपक्रम
जरंडी गावात लोकोपयोगी उपक्रम ग्रामपंचायतमार्फत राबवले जात आहेत. रात्रगस्त, ग्रामस्थांच्या सोयीनुसार बैठका, वनविभाग आपल्यादारी, मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याकामी वनाशेजारील लोकांत जनजागृती, सोशल मीडियाच्या माध्यमातून मानव वन्यजीव संघर्षाबाबत जनजागृती, वनवा बंदी, निसर्ग संवर्धन, ग्रामस्थांच्या सतत बैठका असे विविध उपक्रम सतत राबवले जात आहेत. यावेळी श्रमदानासाठी संतोष पाटील,सतिष बाविस्कर, अंबु राठोड, सिद्धार्थ दांडगे, भास्कर निकम्, अनिल शिंदे आदींसह ग्रामस्थ हजर होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments