Friday, April 10, 2026
Homeऔरंगाबादजनतेच्या मनातील आमदार आपणच असल्याचे सामाजिक उपक्रमातून दाखवून दिले

जनतेच्या मनातील आमदार आपणच असल्याचे सामाजिक उपक्रमातून दाखवून दिले

जनतेच्या मनातील आमदार आपणच असल्याचे सामाजिक उपक्रमातून दाखवून दिले

 मा.आ.कैलास गोरंटयाल यांनी व्यक्त केली भावना @ अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव @ शालेय साहित्यही दिले भेट
जालना/प्रतिनीधी/ मागील सप्ताह भरापासून लोकोपयोगी सामाजिक उपक्रम उत्स्फूर्तपणे राबवून वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा देत जनतेच्या मनातील आमदार आपणच असल्याचे दाखवून दिले अशी भावना जालन्याचे माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंटयाल यांनी आज येथे बोलतांना व्यक्त केली.
आज गुरुवारी सकाळी माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी आपल्या वाढदिवसाची सुरुवात पत्नी नगरसेविका सौ.संगीताताई गोरंटयाल, नगरसेवक युवा नेते अक्षय गोरंटयाल यांच्यासह पाताल हनुमान मंदीरात दर्शन व आरती करून केली. त्यानंतर विविध कार्यक्रमांना हजेरी लावत शहरातील गुरू गणेश भवनमध्ये त्यांनी दुपारी वाढदिवसा निमित्त जालना शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यावसायिक, उद्योजक आणि हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, यावर्षी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर देण्याच्या सूचना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांना देण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने जालना शहर व ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, अन्नदान, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, गोशाळेत चारा वाटप अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमुळे सर्वसामान्य जनतेला मदत, त्यांची सेवा करण्याची संधी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मिळाली आहे. मतदार संघातील जनतेचे भक्कम पाठबळ आणि आशीर्वाद असल्यामुळे काम करण्याची ऊर्जा मिळते.हा आशीर्वाद व पाठबळ भविष्यात देखील कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त करून वाढदिवसा निमित्त भरगच्च सामाजिक उपक्रम राबवून भरभरून शुभेच्छा दिल्याबद्दल माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेचे आभार मानले. दरम्यान, वाढदिवसा निमित्त राज्याच्या पशू संवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजाताई मुंढे, राज्याचे ओबीसी कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे,माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांनी भ्रमण ध्वनीवरून माजी आमदार कैलास गोरंटयाल यांना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या तर गुरू गणेश भवनमध्ये जालन्याच्या महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, स्थायी समिती सभापती अशोक पांगारकर, सभापती पूनम स्वामी, माया जोशी, अशोक पवार,भाजपा गटनेते महेश निक्कम, नगरसेवक महावीर ढक्का,रमेश गौरक्षक, अजय भरतीया, वीरेंद्र धोका, रोहित भुरेवाल, संतोष माधोवाले, सतीश जाधव, विनोद रत्नपारखे, विजय पांगारकर, जीवन सले, कार्तिका इंगळे, श्रीमती रिमा खरात,  सौ.आढेकर, अंबडचे नगरसेवक केदार कुलकर्णी, उद्योजक केदार मुंदडा, कैलास लोया, नरेंद्र अग्रवाल, अशोक शर्मा, विनोद पाटणी, रमेश दाड, विजय कामड, सुदेश सकलेचा, कचरूलाल कुंकुलोळ, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आशिष देशमुख, गोवर्धन कोल्हे, सुदेश सकलेचा, ज्येष्ठ नेते फुलचंद भककड, रामेश्वर पाटील भांदरगे, अंकुशराव राऊत, ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, गोविंदप्रसाद मुंदडा, प्रा. रावसाहेब ढवळे, डॉ.सतीश मोरे, डॉ.आशिष राठोड, रामराव मगर, ज्येष्ठ नेते एकबाल पाशा, दीपक भुरेवाल, शाह आलम खान, मसूद खान, बदर चाऊस, अतिक खान, विनोद यादव, संजय भगत, अशोक भगत, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत साहनी, विजय सुराणा, मोहन इंगळे, राजेश खिवंसरा, प्रकाश काठेड, शितल तनपुरे, चंदाताई भांगडीया, मंगलताई खांडेभराड, मंदाताई पवार, मनोज जैस्वाल, डॉ.संजय रुईखेडकर, विधीज्ञ राहुल चव्हाण, शेख याकूब, प्रा.मदन, प्रा.रमेश शेळके, दिलीप मोरे, धनराज काबलीये, चंपालाल भगत, सुनील खरे, गोपाल चित्राल, रमेश पैठणे, नानासाहेब उगले, माजी जि.प.सदस्य संजय काळबांडे गजानन खरात, कंत्राटदार सुधाकर पवार, माजी नगरसेवक विजय पवार, आमेर पाशा, रामनगर सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीचे पदाधिकारी, कृष्णा पडूळ, राजू पोरवाल, ज्ञानेश्वर डुकरे, दीपक कावले, गोपाल मोरे, संदीप खरात, शिवा शेजूळ, अरुण सरदार, वैशाली सरदार, सुनील रत्नपारखे, धर्मा खिल्लारे, अभियंता सय्यद सऊद, इंजि.अनंता लोखंडे, सगीर अहेमद, राजेश ओ. राऊत, रहिमभाई तांबोळी, दत्ता घुले पाटील,दीपक कायंदे, मुरलीधर जाधव यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रातील पदाधिकारी तसेच शहरी व ग्रामीण भागातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments