जिल्ह्यात जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन
जालना :- जिल्ह्यात जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत महसूल मंत्री यांनी आदेश दिले आहेत. या निर्देशानूसार जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि.26 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 वाजता जालना तालुक्यातील नेर व गुरुवार दि.28 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता अंबड तालुक्यातील बठाण येथे जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जनसंवाद कार्यक्रमातंर्गत नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ग्रामपातळीवरील सर्व यंत्रणेचे अधिकारी जनसंवाद कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. असेही कळविले आहे.
