अनुसूचित जमातीचा सामुहिक विवाह सोहळा
आयोजनासाठी स्वंयसेवी संस्थांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर :- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यक्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, व लातुर जिल्यातील अनुसूचित जमातीच्या लाभधारकांना कन्यादान योजने अंतर्गत सन २०२५-२६ या वित्तीय वर्षात अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांच्या विवाह सोहळयातील अनुचित प्रथांना आळा घालण्यासाठी सामुहिक विवाह सोहळा आयोजनासाठी स्वंयसेवी संस्थेमार्फत प्रोत्साहन देवुन अशा विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या दाम्पत्यांना अर्थिक सहाय्य देण्यासाठी कन्यादान योजना राबविण्यासाठी संस्थेमार्फत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगरच्या प्रकल्प अधिकारी चेतना डी.मोरे यांनी केले आहे.
कन्यादान योजनेसाठी सादर करावयाचे प्रस्ताव व कागदपत्रांमध्ये सदर संस्थेने सादर करावयाचा प्रस्ताव विहीत नमुन्यातील अर्ज (कार्यालयात उपलब्ध), सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या संस्थेने आपल्या प्रस्तावासोबत विवाह (लग्नाचे) ठिकाणाचा पत्ता व दिनांक सोबत जोडुन सादर करावे, विवाह विषयक माहिती (कार्यालयात उपलब्ध) तसेच वर व वधु लाभार्थ्याचे सत्यप्रतीचे प्रस्ताव अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे.
कन्यादान योजनेचा अनुसूचित जमाती लाभार्थ्याच्या विवाह सोहळयासाठी अर्जाचा नमुना शासकीय सुटी सोडुन कार्यालयीन वेळेत मिळणार आहे. प्रस्ताव परिपूर्ण भरुन कार्यालयात ३१ ऑगस्ट, २०२५ पर्यत दाखल करणे आवश्यक आहे. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही, असेही पत्रात म्हटले आहे.
