जालन्यात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्यानं टट्टूपुरा भागात नाल्याचं पाणी रस्त्यावर
महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळं नालीची घाण आणि कचरा रस्त्यावर..
महापालिकेच्या मॉन्सूनपूर्व तयारीची अवकाळी पावसानं लावली वाट,गटारील कचरा थेट रस्त्यावर..
जालना प्रतिनीधी / बबनराव वाघ : जालन्यात पाऊस पडल्यानं नाल्याचं पाणी रस्त्यावर आल्याचे बघायला मिळालायं. जालना शहरात आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लगावली. त्यामुळं शहरातील अनेक भागात पावसामुळे नाल्याचं पाणी रास्त्यावर आल्याचे बघायला मिळालंय. शहरातील राजाबाग सवार ते टट्टूपुरा भागात नाल्याचं पाणी थेट रस्त्यावर आलंय. यात पाण्यासह कचरा आणि घाण कचरा ही रस्त्यावर आलं. त्यामुळं या भागातील नागरिकांना घाण आणि दुर्गंधीचा सामना करावा लागलाय.
महापालिकेच्या मॉन्सूनपूर्व तयारीची अवकाळी पावसानं अक्षरशः वाट लावली आहे.आज शहरात झालेल्या दिड तास मुसळधार पावसामुळे गटारील कचरा थेट रस्त्यावर आला आहे.त्यामुळे महापालिकेचं नियोजनाचं भांडं फुटलं आहे.जालना महापालिकेचे अधिकारी मॉन्सूनपूर्व तयारी सुरू असल्याचे सांगतात.मात्र तशी कोणतीही तयारी सुरू झाली नसल्याचं आजच्या अवकाळी पावसामुळे उघड झाले आहे.आज शहरात तब्बल दीड तास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.त्यामुळे राजाबाग सवार ते टट्टूपुरा भागात रस्त्यावरील घाण आणि केरकचरा पावसाच्या पाण्यात वाहून येऊन थेट रस्त्यावर आली आहे. त्यामुळे महापालिकेचं भांडं चांगलंच फुटलं असून महापालिकेच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त होत आहे.
त्यामुळं या भागातील नागरिकांना घाण आणि दुर्गंधीचा सामना करावा लागलाय. या बाबत महानगरपालिकेच्या कर्मचार्यांना कळविण्यात आलंय मात्र पालिकेनॅ दुर्लक्ष केल्याचं स्थानिक नागरीकांच म्हणन आहे.