जालना जिल्हयात युवक महोत्सवाचे आयोजन
’मत्स्योदरी’ महाविद्यालयात १५ सप्टेंबर रोजी उद्घाटन
जालना, दि.२८ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा युवक महोत्सव यंदापासून जिल्हानिहाय होणार आहे. जालना जिल्हयाचा युवक महोत्सव १५ व १६ सप्टेंबर रोजी अंबड येथील मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयात होणार आहे.
युवक महोत्सवाच्या तयारीसाठी मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षेतेखाली सल्लागार समिती ची बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, संचालक डॉ.वैâलास अंभुरे यांच्यासह सल्लागार समितीचे सदस्यांची उपस्थिती होती. बैठकीत महोत्सवाच्या आयोजनाबाबत विस्तृतपणे चर्चा झाली. यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व धाराशिव चारही जिल्यात युवक महोत्सवाचे आयोजन केल्यानंतर लगेच ’केंद्रीय युवक महोत्सव’ घेण्याचा निर्णय घेण्यात आला. गुणानुक्रमे पहिले तीन संघ केंद्रीय महोत्सवात सहभागी होतील. जिल्हा महोत्सव संलग्नित महाविद्यालयात तर केंद्रीय महोत्सव विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीगनर या मुख्य कॅम्पस मध्ये घेण्यात येणार आहे. युवक महोत्सवासाठी संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ही ऑनलाईन ठेवण्यात आली आहे. यामध्ये जालना जिल्हयातील युवक महोत्सव अंबड येथील मत्स्योदरी शिक्षण संस्थेत होणार आहे. या महाविद्यालयात १५ व १६ सप्टेंबर रोजी या जिल्हयातील ९३ महाविद्यालयांचे संघ यात सहभागी होणार आहेत. प्राचार्य डॉ.मिलिंद पंडित, सांस्कृतिक समन्वयक डॉ.विनोद जाधव यांची यावेळी उपस्थिती होती.
सहा गटात कला प्रकार
यंदाच्या युवक महोत्सवात एकूण पाच गटात २८ कलाप्रकार सादर होणार आहेत. तसेच शोभायात्रा हा स्वंतत्र कलाप्रकारही असणार आहे. कला विभाग व कलाप्रकार पुढील प्रमाणे :-
१) संगीत विभाग (दहा प्रकार) – भारतीय शास्त्रीय गायन, भारतीय शास्त्रीय वाद्य संगीत, भारतीय शास्त्रीय वाद्य संगीत (स्वरवाद्य), नाटयसंगीत, भारतीय सुगम संगीत (भा), भारतीय समूहगान (भा), भारतीय लोकसंगीत वाद्यवृंद, पाश्चिमात्य गायन, पाश्चिमात्य वाद्य संगीत, पाश्चिमात्य समूहगाय.
२) नृत्य विभाग – भारती शास्त्रय नृत्य, भारतीय लोकसमुह
३) नाटय विभाग – एकांकिका, प्रहसन, नक्कल, मूकअभिनय
४) वाड्ःमय विभाग – वादविवाद, प्रश्नमंजूषा, वत्तृâत्व
५) ललित कला विभाग – स्थळचित्र, चिकटकला, पोस्टर मेकिंग, मातीकला, व्यंगचित्रे, रांगोळी, स्थळ छायाचित्रण, इंस्टालेशन, लघुचित्रपट.
३१ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन नोंदणी
शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ चा जालना जिल्हा युवक महोत्सव १५ ते १६ सप्टेंबर या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवातील विद्यार्थी, कलावंत, साथीदार व संघप्रमुखांच्या ऑनलाईन नोेंदणीचा कालावधी २१ ते ३१ ऑगस्ट २०२५ असून ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय व केंद्रीय युवा महोत्सव अतंर्गत सादर होणा-या सर्वच कलाप्रकारासाठी नोंदणी करावी. त्यानंतर प्रवेशिकेसोबत सर्व प्रपत्रे व आवश्यक कागदपत्रे जोडून प्रवेशिकेची हार्ड कॉपी ३ सप्टेंबर पर्यंत हरिश्चंद्र साठे, विद्यार्थी विकास विभाग यांच्याकडे जमा करावी. यानंतर कोणत्याही प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाही, यांची नोंद घ्यावी, असे संचालक डॉ.वैâलास अंभुरे व प्राचार्य डॉ.मिलिंद पंडित यांनी कळविले आहे.
